घरमुंबईBMC : झोन दोनचे उपायुक्त प्रशांत सपकाळे तर, जी नॉर्थच्या सहायक आयुक्तपदी...

BMC : झोन दोनचे उपायुक्त प्रशांत सपकाळे तर, जी नॉर्थच्या सहायक आयुक्तपदी अजितकुमार आंबी

Subscribe

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनाने अखेर सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्याकडे झोन दोनच्या उपायुक्तपदाची सूत्रे सोपविली. तर, जी नॉर्थच्या सहायक आयुक्तपदी अजितकुमार आंबी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर, प्रशांत गायकवाड यांना उपायुक्तपदी बढती मिळाल्याने त्यांच्याकडील सहायक आयुक्त (मालमत्ता) विभागाचा अतिरिक्त कार्यभार विनायक विसपुते यांच्याकडे सोपवला आहे.

हेही वाचा – Modi Govt : वानखेडे आणि शिंदेंबाबत कायद्याचे दुहेरी मापदंड का? ठाकरे गटाचा थेट सवाल

- Advertisement -

पालिकेचे उपायुक्त केशव उबाळे सेवानिवृत्त झाल्यानंतर 1 मे 2022 रोजी दादर, माहिम आणि धारावी या जी नॉर्थ प्रशासकीय विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांना उपायुक्तपदी बढतीस पात्र ठरले, परंतु त्यांना बढती मिळाली नाही. त्यानंतर, प्रशांत सपकाळे यांच्याकडे गेल्यावर्षी मार्चमध्येच उपायुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, तसे अधिकृत पत्र त्यांना देण्यात आले नव्हते. जवळपास वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर त्यांना झोन दोनच्या उपायुक्तपदी नियुक्ती केल्याचे पत्र देण्यात आले आहे. तशीच स्थिती अजितकुमार आंबी यांची होती. मागील अनेक महिन्यांपासून ते पदाविना कार्यरत होते. पण आता प्रशांत सपकाळे यांच्या नियुक्तीमुळे रिक्त झालेल्या जी उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तपदी अजितकुमार आंबी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या सामान्य विभागाकडून सोमवारी पदोन्नती आणि बदलीबाबतचे आदेश जारी करण्यात आले. त्यानुसार परिमंडळ दोनचे उपायुक्त रमाकांत बिरादर यांच्या जागी सपकाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, पुढील दोन महिन्यांनी बिरादर सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बिरादर यांना निवृ्त्तीपर्यंत बिगर पदाचे कार्यरत राहावे लागेल.

- Advertisement -

हेही वाचा – SANJAY RAUT : ”…तुरुंगात जाण्यापेक्षा भाजप बरा”; संजय राऊतांची सडकून टीका

तर, उपायुक्त (वित्त) रामदास आव्हाड हे सेवानिवृत्त झाल्याने सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांना त्या पदावर बढती देण्यात आली. प्रशांत गायकवाड यांची प्रभारी उपायुक्तपदी (वित्त) नेमणूक करून सहायक आयुक्तपदाचा (मालमत्ता) भार त्यांच्याकडे ठेवला होता. परंतु आता सपकाळे यांना परिमंडळ दोनच्या उपायुक्तपदी नियुक्ती करून त्यांच्या जागी म्हणजेच, जी उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तपदी अजितकुमार आंबी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गायकवाड यांच्याकडील मालमत्ता विभागाचा भार एच पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून सोपविण्यात आला आहे. एच पश्चिम विभागासह मालमत्ता विभागाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे असेल असे या नियुक्तीच्या आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा – Farmers Protest : आज दिल्लीत शेतकरी मोर्चा; राजधानीत कडेकोट पोलीस बंदोबस्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -