घरताज्या घडामोडीमुंबई महापालिकेतील अभियंत्यांच्या पदोन्नतीचा रखडलेला प्रस्ताव मंजूर 

मुंबई महापालिकेतील अभियंत्यांच्या पदोन्नतीचा रखडलेला प्रस्ताव मंजूर 

Subscribe

पदोन्नतीसाठी प्रतिक्षेत असलेल्या अभियंत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई महापालिकेतील १३२ अभियंत्यांच्या पदोन्नतीबाबतचा प्रस्ताव गेल्या महिन्याभरापासून रखडलेला होता. अखेर शुक्रवारी पार पडलेल्या पालिका सभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे पदोन्नतीसाठी प्रतिक्षेत असलेल्या अभियंत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी सदर प्रस्ताव मंजूर केल्यानंतर बृहन्मुंबई महापालिका इंजिनिअर युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष व म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुखदेव काशिद यांच्यासह रमेश भुतेकर आदी शिष्टमंडळाने महापौरांना भेटून त्यांचे आभार व्यक्त केले.

मुंबई महापालिकेच्या १०५ सहाय्यक अभियंत्यांना कार्यकारी अभियंता, तर २६ कार्यकारी अभियंत्यांना उपप्रमुख अभियंता या पदांवर पदोन्नती देण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित होता. त्यावर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसतर्फे आक्षेप घेण्यात आला होता. अभियंत्यांना पदोन्नती देताना काहींची सेवाज्येष्ठता डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे सदर प्रस्ताव वादग्रस्त ठरला होता.

- Advertisement -

अभियंत्यांना पदोन्नती देण्याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित राहिल्याने अभियंते चिंतेत होते. काही अभियंत्यांची निवृत्ती जवळ आली होती, तर काहींची सेवेची दोन-तीन वर्षे बाकी होती. पदोन्नतीशिवाय निवृत्त झाल्यास पदोन्नतीच्या लाभांपासून व आर्थिक फायद्यापासून त्यांना वंचित राहावे लागणार होते. मात्र, शुक्रवारी झालेल्या सभेत अभियंत्यांना पदोन्नती देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यामुळे पदोन्नतीच्या रांगेत असलेल्या सर्व अभियंत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.


हेही वाचा – मुंबई महापालिका कामकाजात काँग्रेस प्रथम

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -