Eco friendly bappa Competition
घर मुंबई BMC : पावसाळ्यात पंप बंद पडल्यास अभियंत्यावर कारवाई; ४७७ ठिकाणी होणार उपसा

BMC : पावसाळ्यात पंप बंद पडल्यास अभियंत्यावर कारवाई; ४७७ ठिकाणी होणार उपसा

Subscribe

 

मुंबई: पावसाळ्यात समुद्राला भरती असताना अतिवृष्टी होऊन सखल भागात पावसाचे पाणी कमी – अधिक प्रमाणात साचते. मात्र साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेने यंदा ४७७ ठिकाणी खास पंपांची व्यवस्था केली आहे. मुंबईकरांना या पाणी उपसा करणाऱ्या पंपांमुळे निश्चित दिलासा मिळेल, असा विश्वास उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

मात्र ऐन पावसाळ्यात हे पंप जर बंद पडून साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्यास संबंधित विभागाच्या जबाबदार सहाय्यक अभियंत्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. मुंबईत दरवर्षी चांगला पाऊस पडत आहे. यंदाही मुंबई व परिसरात चांगला पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात एकाच दिवशी सरासरी ५५ मिमी पेक्षाही जास्त पाऊस पडल्यास, अतिवृष्टी झाल्यास व त्याच सुमारास समुद्राला मोठी भरती असल्यास (समुद्रात अंदाजे साडेचार मिटर उंचीच्या किंवा त्यापेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळल्यास) मुंबईतील सखल भागात पावसाचे पाणी कमी – अधिक प्रमाणात साचते. या साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिका प्रशासन सदर सखल भागाच्या ठिकाणी पंपांची व्यवस्था करते. यंदा शहर व उपनगरे येथील ४७७ ठिकाणी पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पावसाळ्यात सखल भागात पावसाचे पाणी साचून नागरिकांना व रस्ते वाहतुकीला त्रास होऊ नये, यासाठी ४७७ ठिकाणी पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. पंपाच्या ठिकाणी ऑपरेटर आणि मदतनीस असे मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे. त्यासोबतच पंप गरजेच्या काळात योग्यरीत्या सुरू राहील, याची जबाबदारीही समन्वय अधिकारी म्हणून विभागातील सहायक अभियंत्यावर निश्चित करण्यात आली आहे. तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याच्या सूचनाही वरिष्ठ प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. सखल भागात २४ तास पंप सज्ज राहतील, हीदेखील जबाबदारी समन्वय अधिकाऱ्यांवर असणार आहे.

पाणी उपसा करणारे पंप कोणत्या भागात किती?

- Advertisement -

मुंबईतील सखल भागात पाणी उपसा करणाऱ्या पंपांमध्ये शहर भागात एकूण १८७ पंप आहेत. पश्चिम उपनगरामध्ये एकूण १६६ पंप आणि पूर्व उपनगरामध्ये एकूण १२४ पंप आहेत. शहर भागात अ विभागात सर्वाधिक २५ पंप आहेत. तर पश्चिम उपनगरात एफ/ दक्षिण विभागात ३२, एफ/पूर्व विभागात ४७ पंप आहेत. तर पश्चिम उपनगरामध्ये एच/पूर्व विभागात ५५ पंप आणि एच/पश्चिम विभागात २४ पंप आहेत. तर पूर्व उपनगरात विभागात ४८ पंप आणि एम/ पश्चिम विभागात २१ पंप आहेत.

पंप लावण्यात आलेले विभाग

कुलाबा गीता नगर, ओएनजीसी यलो गेट, गोल देऊळ (ग्रॅंट रोड), नाना चौक, हॅंकॉक ब्रीज, जिजामाता उद्यान (भायखळा), एअर फोर्स स्टेशन (कॉटन ग्रीन), सरदार हॉटेल (चिंचपोकळी), जिजामाता नगर (अभ्युदय नगर), परळ पूर्व स्टेशन बाहेर, टाटा मिल कंपाऊंड (परळ), शिंदेवाडी कोर्ट (दादर), हिंदमाता उड्डाणपूलाच्या खालील बाजुला, सेंट झेव्हीयर्स उद्यान (परळ), प्रतिक्षा नगर (सायन), वडाळा अग्निशमन केंदग्र (एंटॉप हिल), दादर टी.टी. बेस्ट वर्कशॉप, भरणी नाका (वडाळा), करी रोड रेल्वे कल्वर्ट, महालक्ष्मी कल्वर्ट, धारावी कोळीवाडा, खार भूयारी मार्ग, साहित्य सहवास (कलानगर), चमडावाडी नाला (वांद्रे), बीकेसी मेट्रो स्टेशन (वांद्रे), गोळीबार आऊटफॉल (हंसबर्ग जंक्शन), विद्यानगरी मेट्रो स्टेशन (कलिना), एअर इंडिया रोड (सांताक्रूझ), भाभा हॉस्पिटल (वांद्रे), मिलन भूयारी मार्ग, जोगेश्वरी भूयारी मार्ग, खार भूयारी मार्ग, टीचर्स कॉलनी (अंधेरी), मोतीलाल नगर (गोरेगाव), मालाड भूयारी मार्ग, पोयसर भूयारी मार्ग, नॅन्सी कॉलनी, शिंपोली (बोरिवली), दहिसर सबवे, काजुपाडा पाईपलाईन (कुर्ला), कुर्ला स्थानक, टिळक नगर स्थानक, देवनार पशुवधनगृह, पोस्टल कॉलनी (चेंबूर), पंत नगर( घाटकोपर), विद्याविहार स्टेशन, नाहूर रेल्वे स्थानक, हरियाली व्हिलेज (विक्रोळी), केईएम रूग्णालय (परळ), लोकमान्य टिळक रूग्णालय कर्मचारी वसाहत (सायन).

- Advertisment -