मुंबईतील सर्व शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच; महापालिका आयुक्तांचे आदेश

मुंबईतील सर्वच खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा येत्या ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

Corporators worried about lack of funds, need for extension
नगरसेवकांना निधी लॅप्स होण्याची चिंता, हवीय मुदतवाढ

एकीकडे देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात शाळा सुरु करण्यासंदर्भात हालचाली सुरु आहेत. माध्यमिक शाळेतील नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा मानस शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. पण, मुंबई महापालिकेच्या शाळा येत्या ३१ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

महाराष्ट्र राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला घेतला होता. या निर्णयानुसार येत्या २३ नोव्हेंबरपासून राज्यातील सर्वच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत. त्यानुसार येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा या बंदच ठेवण्यात येणार आहेत.

राज्यात सध्या दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यामुळे कोरोनाच्या संख्येत देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत कोरोनाची स्थिती वाढू नये, याची काळजी घेत आहे.

येत्या २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, आता दिल्लीतील परिस्थिती पाहता ३१ डिसेंबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. कोरोनाची स्थिती जर वाढली तर विद्यार्थ्यांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु होणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. काही वेळातच याबाबतच परिपत्रक पालिकेकडून जारी केले जाणार आहे.

महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत. या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपुर्ण ठरणार आहे. शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही तरी आँनलाईन शिक्षण पद्धती चालूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी आणि शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.


हेही वाचा – कोरोना लसीसाठी विमानतळावर कार्गो युनिट तयार