घरताज्या घडामोडीपालिकेने अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याची तातडीने खरेदी करावी

पालिकेने अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याची तातडीने खरेदी करावी

Subscribe

वैद्यकीय साहित्य अत्यावश्यक बाब नाही मात्र खरेदी करणे गरजेचे

मुंबई महापालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या वैद्यकीय साहित्य सामग्रीची खरेदी तातडीने करावी. मात्र जे वैद्यकीय साहित्य अत्यावश्यक बाब नाही मात्र खरेदी करणे गरजेचे आहे, त्यांच्या खरेदीबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करावेत, असे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत.

मुंबईत सध्या कोरोनाचा संसर्ग जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीपासून वाढला आहे. तसेच, कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी बेड, आयसीयू बेड, लस, ऑक्सिजन, रक्त यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पालिका प्रशासनाने लस, व्हेंटिलेटर आदी अत्यावश्यक वैद्यकीय साहित्यांची खरेदी स्थायी समितीने बहाल केलेल्या अधिकारांच्या अखत्यारीत मध्यवर्ती खरेदी केंद्रामार्फत करावी. तसेच, या खरेदीबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत नियमाने कार्योत्तर मंजुरीसाठी सादर करावेत, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत.

- Advertisement -

मात्र कोरोनासाठी तातडीची आवश्यक बाब नसलेल्या मात्र रुग्णालय व रुग्णांसाठी गरजेचे असलेल्या सॅनिटायझर, हँडग्लोव्हज आदीं साहित्याच्या खरेदिचे प्रस्ताव प्रशासनाने रीतसर स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करावेत, असे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.


हेही वाचा – कोरोना उपाययोजनांबाबत स्थायी समिती अंधारात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -