घरताज्या घडामोडीBMC : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी महापालिका यंत्रणा सज्ज

BMC : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी महापालिका यंत्रणा सज्ज

Subscribe

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त मुंबई महापालिकेच्या वतीने दादर स्थित चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, 'राजगृह' येथील निवासस्थान तसेच परिसरात नागरी सेवासुविधांसह विविध तयारी करण्यात आली आहे.

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त मुंबई महापालिकेच्या वतीने दादर स्थित चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, ‘राजगृह’ येथील निवासस्थान तसेच परिसरात नागरी सेवासुविधांसह विविध तयारी करण्यात आली आहे. तसेच, आपत्कालिन घटना हाताळण्यासाठी महापालिका, पोलीस, अग्निशमन दल, आपत्कालिन व्यवस्थापन विभाग यांनी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. (BMC The municipal system is ready for Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar birth anniversary)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरातून लाखो अनुयायी येतात. सदर अनुयायांना विविध प्रकारच्या नागरी सोयीसुविधा पुरवण्याच्या उद्देशाने महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

महापालिकेकडून करण्यात आलेली तयारी

मुंबई महापालिकेकडून, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये आदी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर चैत्यभूमी परिसरात लावलेल्या एलईडी स्क्रिनवर चैत्यभूमीतून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तसेच, सीसीटीव्ही, चैत्यभूमीजवळ समुद्रात जीवरक्षक बोटी आणि अग्निशमन व नियंत्रण कक्ष सेवा आदींचा देखील या सुविधांमध्ये समावेश आहे.

दरवर्षीप्रमाणे, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्याकरिता मुंबई महापालिकेतील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी पुरेशा संख्येने नेमलेले आहेत. उपआयुक्त (परिमंडळ – २) प्रशांत सपकाळे आणि सहायक आयुक्त (जी/उत्तर) अजितकुमार अंबी यांच्या देखरेखीखाली सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

- Advertisement -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारीत छायाचित्र प्रदर्शन

दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेच्या जनसंपर्क विभागामार्फत चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

चैत्यभूमी परिसर सुशोभीकरण

चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासह सभोवतालच्या कठड्यांना रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्तूपाची सजावट ही विविध रंगांच्या फुलांनी करण्यात येत आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाकडून चैत्यभूमी परिसरातील उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच, तोरणा द्वार, अशोक स्तंभाची रंगरंगोटी आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मृती व्हिवींग डेक देखील सजवण्यात आले आहे.


हेही वाचा – Mumbai Local Trains : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला मेगाब्लॉक नको; शिवसेनेची रेल्वेकडे मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -