Maharashtra Assembly Election 2024
घरमुंबईBMC : ...तर मलबार हिल जलाशय फुटेल अन्..., पालिकेच्या आजी - माजी...

BMC : …तर मलबार हिल जलाशय फुटेल अन्…, पालिकेच्या आजी – माजी अधिकाऱ्यांचा इशारा

Subscribe

मुंबई : मुंबई महापालिकेतील आजी आणि माजी अधिकारी, अभियंते यांच्या मुंबई विकास समितीकडून मलबार हिल परिसरातील पाण्याच्या प्रश्नावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापालिका प्रशासनाला इशारा देताना समितीकडून सांगण्यात आले की, 137 वर्षे जुन्या मलबार हिल जलाशयाची लवकरात लवकर दुरुस्ती न केल्यास हा जलाशय फुटेल. त्यामुळे या जलाशयातील पाणीपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या ‘ए’, ‘बी ‘,’ सी ‘, ‘डी ‘ या चार विभागातील नागरिकांना पाण्याविना राहावे लागेल. (BMC then Malabar Hill Reservoir will burst ex officers warn of municipal grandmother)

हेही वाचा – Ashish Shelar : देव, देश आणि धर्मासाठी निवडणूक लढवायचीय; ईशान्य मुंबईतून भाजपाची प्रचाराला सुरुवात

- Advertisement -

मुंबईतील विविध विकासकामे, योजना, मोहिमा याबाबत सदर समिती अभ्यास करते आणि त्यातील त्रुटी निदर्शनास आणून देते. तसेच, पालिकेतील आजी, माजी अभियंते विविध विभागात केलेल्या कामाचा अनुभव मुंबई शहराच्या विकासासाठी व्हावा, या उद्देशाने काम करते आणि त्यासंदर्भात अहवाल प्रसिद्ध करते. त्याचप्रमाणे, महापालिका दरवर्षी सादर करीत असलेल्या अर्थसंकल्पातील विकासकामे, त्यासाठी कोट्यवधी रुपयांची करण्यात येणारी तरतूद, सदर कामांचा आढावा घेणे, कामांच्या ठिकाणी भेटी देवून पाहणी करणे आणि त्यावर देखरेख ठेवण्याचे काम समितीकडून करण्यात येते. तसेच, विकास कामांबाबत सुधारणा करण्यासाठी समिती पालिका प्रशासनाला भाग पाडते. यासंदर्भातील माहिती मुंबई विकास समिती तर्फे प्रसाद आकेरकर, नंदकुमार साळवी, चंद्रशेखर खांडेकर, अनिल गचके, अभियंते साईनाथ राजाध्यक्ष आणि यशवंत धुरी यांनी दिली.

मुंबई महापालिकेत विविध खात्यात अभियंत्यांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असून ती भरणे आवश्यक असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे मुंबईत 1900 किमी डांबरी रस्त्यांपैकी 1200 किमी लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनविण्यात आले आहेत. मात्र रस्त्यांची कामे करताना त्या ठिकाणी देखरेख करण्यासाठी पालिकेकडून किमान 3 ते 4 अभियंत्यांची नेमणूक करायला पाहिजे, असे मत नंदकुमार साळवी यांनी यावेळी व्यक्त केले.

- Advertisement -

हेही वाचा – Sugar Factory : साखर कारखान्यांना मोठा दिलासा; केंद्राकडून अकरा हजार कोटी कर्जाची पुनर्बांधणी

पालिका आयुक्त म्हणून अभियंता पदावरील अधिकारी हवेत

मुंबई महापालिकेच्या आयुक्त या महत्वाच्या पदावर मुंबईत विकासकामे करणाऱ्या अभियंता पदावरील अधिकाऱ्यांची नेमणूक व्हायला पाहिजे. आयुक्त हे सनदी अधिकारी असतात व ते फक्त तीन वर्षेच त्या आयुक्त पदावर काम करतात. त्याउलट अभियंते हे त्याच महापालिकेत कार्यरत असतात. त्यांना शहरातील समस्या, परिसर आदींची चांगली ओळख असते. त्यामुळे विकासकामे झपाट्याने मार्गी लागण्यास मदत होईल, अशी सूचनाही मुंबई विकास समितीकडून करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -