Wednesday, May 5, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई ऑक्सिजनची समस्या होणार दूर! मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्मिती

ऑक्सिजनची समस्या होणार दूर! मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्मिती

महापालिकेकडून १२ रुग्णालयांमध्ये एकूण १६ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

Related Story

- Advertisement -

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे बेड्स आणि ऑक्सिजनच्या बऱ्याच अडचणी येत आहे. आता ही ऑक्सिजनची समस्या दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने एक उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याबाबत येणाऱ्या अडचणी लक्षात घेता महापालिकेकडून १२ रुग्णालयांमध्ये एकूण १६ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. हवेतून ऑक्सिजन बनवणाऱ्या या प्रकल्पांतून प्रतिदिन ४३ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. या १६ प्रकल्‍पांचा एकूण खर्च अंदाजे ९० कोटी रुपये इतका अपेक्षित आहे. या संबंधी निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर महिन्याभरात हा प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्या नियंत्रणाखाली हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.  १६ प्रकल्पांमधून प्रतिदिन ४३ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होईल. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्यावरील महानगरपालिकेचे परावलंबित्‍व कमी होण्‍यासही मदत होणार आहे.

- Advertisement -

कोरोनाच्‍या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात सर्वत्र रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बाधित रुग्‍णांच्‍या फुप्‍फुसांना होणारा संसर्ग लक्षात घेता, त्यांना अधिक क्षमतेने ऑक्सिजन पुरवावा लागतो. त्यामुळे देशभरातील रुग्‍णालयांकडून ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. मात्र, त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येत असून ऑक्सिजन पुरवठ्याबाबत अडचणी येत आहेत. या अडचणी दूर करण्याचा आता मुंबई महापालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

- Advertisement -