घरCORONA UPDATEधारावीतील प्रत्येक नागरिकाची होणार कोरोना टेस्ट!

धारावीतील प्रत्येक नागरिकाची होणार कोरोना टेस्ट!

Subscribe

धारावीतील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी घेतला आहे. धारावीतील १५० खासगी डॉक्टरांनी पालिकेच्या मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दाखविल्याने येत्या १० ते १२ दिवसांत संपूर्ण धारावी परिसरातील नागरिकांची कोरोना चाचणी करणे पालिकेला शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

धारावीवरील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर खासगी डॉक्टरांनी पालिकेच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार राहुल शेवाळे यांनी केले. या आवाहनाला इंडियन मेडिकल कौन्सिल आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने धारावीतील १५० खासगी डॉक्टर्स पालिकेच्या मोहिमेत सहभागी होण्यास तयार झाले आहेत. त्यामुळे २ खासगी डॉक्टर्स आणि ३ पालिका वैद्यकीय कर्मचारी असे ५ जणांचे पथक बनवण्यात येणार आहे. हे पथक सुमारे ५००० नागरिकांची चाचणी करणार आहे. अशा पथकांच्या माध्यमातून १० ते १२ दिवसांत धारावीतील सुमारे साडे सात लाख नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा रीतीने त्वरीत निदान झाल्यास बाधितांना धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये उपचरांसाठी दाखल केले जाईल, तर लक्षणे आढळणाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

धारावीतील परिस्थितीबाबत स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सहाय्यक आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, इंडियन मेडिकल कौन्सिलचे उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचनेकर, डॉ. सुरेंद्र सिगनापुरकर यांसह स्थानिक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. याचबरोबर, धारावी पोलीस स्थानक आणि रुग्णालयांच्या ठिकाणी सॅनिटायझर टनेलही लवकरच उभारण्यात येणार असल्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -