Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई 'रॅपिड अँटीजन चाचणी'बाबत खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार चाप

‘रॅपिड अँटीजन चाचणी’बाबत खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार चाप

Related Story

- Advertisement -

मुंबईत काही खासगी रुग्णालयांत ‘रॅपिड अँटीजन चाचणी’ करताना स्थानिक प्रशासनाकडून परवानगी न घेता केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या मनमानीला चाप लागावा यासाठी पालिकेने काही बंधने घातली आहेत. खासगी रुग्णालयात ज्या रुग्णांमध्ये कोरोनाबाबत काही लक्षणे असतील त्यांचीच ‘रॅपिड अँटीजन चाचणी’ करण्यात यावी. मात्र कोरोनाबाबतची कोणतीही लक्षणं नसलेल्या कुठल्याही व्यक्तीवर ‘रॅपिड अँटीजन चाचणी’ करु नये, असे बजावण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे, ‘रॅपिड अँटीजन चाचणी’ झाल्यानंतर त्यांचे पॉझिटीव्ह/निगेटिव्ह अहवाल, रुग्णांना कळल्यावर २४ तासांच्या आत ‘आयसीएमआर’ च्या पोर्टलवर सादर करणं बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र त्यानंतर ज्या दिवशी रुग्णांचे चाचणीसाठी सॅम्पल घेतले जातील, ते त्याचदिवशी कोरोनाग्रस्त रुग्णांची यादी ‘एमसीजीएम’ च्या Epid cell कडे पाठवणे आवश्यक आहे.

- Advertisement -

वास्तविक, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या २३ जून २०२० च्या मार्गदर्शक सूचनेनुसार, कोरोनासाठीची ‘रॅपिड अँटीजन चाचणी’ ही केवळ कोरोनाबाबत खबरदारीसाठी करायची आहे. मात्र काही खाजगी रुग्णालयं ही चाचणी स्थानिक प्रशासनाकडून परवानगी न घेताच करत आहेत. ‘आयसीएमआर’च्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये ती चाचणी करून घेत आहेत. याची गंभीर दखल पालिका प्रशासनाने घेतली आहे. एखाद्या खासगी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाला कोरोना संदर्भातील लक्षणे म्हणजेच जास्त अशक्तपणा जाणवत असेल तर सदर रुग्णालय त्या रुग्णाची ‘रॅपिड अँटीजन चाचणी’ करू शकतं. त्याचप्रमाणे ज्या रुग्णाचा चाचणी अहवाल पॉसिटीव्ह येईल आणि त्या रुग्णालयात जर बेड रिकाम्या असतील तर अशा रुग्णाला तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दाखल करण्यात यावे.

सदर रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतल्यास त्या रुग्णालयात किती खाटा वापरल्या जात आहेत, याबाबतची माहिती त्वरित ‘डॅशबोर्ड’ वर देणं आवश्यक आहे. तसेच, जर रुग्णालयात खाटा अपुऱ्या असतील तर त्या रुग्णांना ‘होम क्वारंटाईन’ राहण्यासाठी समुपदेशन करावे, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -