खासगी रुग्णालयात बेडची संख्या वाढविणार – महापौर

पीपीई किट घालून कोविड रुग्णांशी महापौरांनी साधला संवाद. खासगी रुग्णालयातील कोरोना बेडच्या सद्यस्थितीचा घेतला आढावा

Mayor kishori pednekar said All the systems of bmc are working for local travel from 15th August

मुंबईत एकीकडे कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे सरकारी, पालिका व खासगी रुग्णालयात बेडची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका कोरोना रुग्णांसाठी खासगी, पालिका रुग्णलयात व नवीन जंबो कोविड सेंटर उभारून बेडची संख्या वाढविण्याच्या तयारीत आहे. खासगी रुग्णालयात

कोरोना बाधित परंतु लक्षणं नसलेले रुग्ण मोठ्या रुग्णालयातील बेड अडकून ठेवत असल्यामुळे गरजू रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी लक्षात घेता, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवार हिंदुजा, बॉम्बे या मोठ्या खाजगी रुग्णालयातील कोरोना वॉर्डला भेट देऊन बेडची सद्यस्थिती जाणून घेतली. यावेळी, त्यांनी या रुग्णालयातील काही रुग्णांशीही संवाद साधला. याप्रसंगी जी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे उपस्थित होते. ज्याप्रमाणे रुग्णसंख्या वाढत आहे त्याप्रमाणे मुंबई महापालिका विविध उपायोजना करीत असून आणखीन नाविन सुविधा वाढवित आहे, असे महापौरांनी सांगितले.

मुंबईतील बॉम्बे व हिंदुजा यांसारख्या मोठ्या रुग्णालयात कोरोना बाधित मात्र लक्षणे नसलेले रुग्ण थेट रुग्णालयात जाऊन बेड अडकून ठेवत असल्याच्या तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगाने महापौर पेडणेकर यांनी, हिंदुजा व बॉम्बे या रुग्णालयांना आज भेट देऊन तेथील बेडच्या व्यवस्थेबाबत माहिती जाणून घेतली. तसेच,हिंदुजा व बॉम्बे यांसारख्या मोठ्या खासगी रुग्णालयातील कोविड बेडची संख्या वाढविण्यासंदर्भात रुग्णालयाच्या व्यवस्थापनासोबत महापौरांनी सविस्तर चर्चा केली.

बॉम्बे रुग्णालयात कोविडसाठी ११० बेड आरक्षित असून ही बेड संख्या २७० पर्यंत वाढविण्यासंदर्भात रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय प्रमुखांशी चर्चा केली असल्याचे महापौरांनी सांगितले. त्याचप्रमाणे हिंदुजा रुग्णालयात ९३ बेड कोविड रुग्णांसाठी आरक्षित असून बेड वाढविण्यासंदर्भात रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय प्रमुखांशी चर्चा केली. ज्या रुग्णांना खऱ्या अर्थाने ऑक्‍सिजन तसेच व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता आहे, त्या रूग्णांना ते बेड मिळाले पाहिजे, हा या भेटीमागे खरा उद्देश असल्याचे महापौरांनी सांगितले.

त्यासोबतच रुग्णालयातील शौचालयांचे दिवसांतून पाच ते सात वेळा निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचे महापौरांनी सांगितले. कोरोनाबाधित असलेले परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांनी महापालिकेच्या सीसी १ वन व सीसी – २ सेंटरमध्ये उपचार घ्यावा, असे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले. त्यासोबतच कोविड रुग्णांनी थेट रुग्णालयात दाखल न होता रुग्णांची रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था ही मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयातील वाँररूममधूनच झाली पाहिजे, असे महापौरांनी सांगितले.

नेहरू सेंटर येथे १५० खाटांचे नवीन रुग्णालय

वरळीच्या नेहरू सायन्स सेंटर याठिकाणी नव्याने १५० रुग्णशय्येचे कोविड समर्पित रुग्णालय तयार होत आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. त्यानंतर वरळीच्या पोद्दार रुग्णालयात नव्याने १९३ बेड सीसी -१ तसेच सीसी – २ अंतर्गत तयार करण्यात आले असून या कामाची पाहणीही महापौरांनी केली.