घरताज्या घडामोडीमुंबईत 3 हजार 679 मॅनहोलवर बसवल्या संरक्षक जाळ्या, झाकणे उघडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

मुंबईत 3 हजार 679 मॅनहोलवर बसवल्या संरक्षक जाळ्या, झाकणे उघडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

Subscribe

अनेकदा पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यासाठी काही नागरिक मॅनहोलवरील झाकणे परस्पर काढून बाजूला ठेवतात. त्यामुळे पाण्याचा निचरा लवकर होण्यास मदत होते.

२०१७ मध्ये परळ येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून डॉ. अमरापूरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी नागरिकांनी परस्पर मॅनहोलची झाकणे उघडू नयेत, असे आवाहन पालिका प्रशासनाने मुंबईकरांना केले आहे. मात्र जर कोणीही मॅनहोलवरील झाकणे परस्पर उघडल्यास संबंधित नागरिकांवर पालिका कायदेशीर कारवाईचा बडगा उगारेल, असा गंभीर इशारा पालिका प्रशासनाने मुंबईकरांना दिला आहे. डॉ. अमरापूरकर यांच्या मॅनहोल अपघाती मृत्यूला जबाबदार काही नागरिकांवर पालिकेने त्याचवेळी चौकशी करून कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला होता.

मुंबईत पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास सखल भागात पाणी साचते. या साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिका प्रशासन कर्मचार्यांमार्फत विविध उपाययोजना करते. मात्र अनेकदा पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यासाठी काही नागरिक मॅनहोलवरील झाकणे परस्पर काढून बाजूला ठेवतात. त्यामुळे पाण्याचा निचरा लवकर होण्यास मदत होते. मात्र हे मॅनहोलवरील झाकण त्याच ठिकाणी पुन्हा व्यवस्थित न लावल्यास व ते तसेच उघडे राहिल्यास त्या मॅनहोलमध्ये कोणी व्यक्ती पडून दुर्घटना होऊ शकते. नेमका असाच काहीसा प्रकार २०१७ मध्ये घडला होता. बॉम्बे रुग्णालयातील पोटविकार तज्ञ डॉ.अमरापूरकर यांचा परळ येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेचे तीव्र पडसाद पालिकेत उमटले होते. पालिका स्थायी समिती, पालिका सभागृहात या घटनेवरून सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पालिका प्रशासनावावर तोफ डागत चांगलेच फैलावर घेऊन जाब विचारला होता.

- Advertisement -

तेव्हापासून खडबडून जागृत झालेल्या मुंबई महापालिकेने मॅनहोलवरील झाकणांची अधिक काटेकोरपणे काळजी घेण्यास सुरुवात केली. मुंबईत पावसाळापूर्व कामाचा भाग म्हणून दरवर्षी सर्व ठिकाणच्या मॅनहोलची तपासणी करून आवश्यक ती दुरूस्ती करण्यात येते, असे पालिकेचे म्हणणे आहे. यंदा देखील ठिकठिकाणी असलेल्या मॅनहोलची तपासणी करुन दुरुस्ती करणे, आवश्यक तेथे नवीन मॅनहोल लावणे ही कामे हाती घेण्यात आली आहेत. जोरदार पावसानंतर आणि पाण्याचा निचरा झाल्यानंतर देखील महापालिकेच्‍या वतीने पुन्‍हा एकदा सर्व रस्‍त्‍यांची पाहणी करुन मॅनहोलची तपासणी केली जाते.


हेही वाचा : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, आता अडीच तासात पार करता येणार मुंबई-पुणे अंतर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -