घरताज्या घडामोडीBMC चा चिटणीस विभाग प्रशासनाच्या ताब्यात? लोकप्रतिनिधींचे प्रभुत्व कमी होणार!

BMC चा चिटणीस विभाग प्रशासनाच्या ताब्यात? लोकप्रतिनिधींचे प्रभुत्व कमी होणार!

Subscribe

लोकप्रतिनिधींचे प्रभुत्व कमी करण्याचा प्रशासनाचा डाव

मुंबई महापालिकेचे चिटणीस खाते हे लोकप्रतिनिधींचे प्रभुत्व असलेल्या स्थायी समिती अध्यक्षांच्या अखत्यारित येत असले तरी सध्या हे खाते पूर्णपणे महापालिका प्रशासनाच्या ताब्यात जाताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत हे खाते पूर्णपणे प्रशासनाने आपल्या ताब्यात घेवून आपल्या मर्जीप्रमाणेच प्रशासन या विभागाकडून काम करून घेत आहे.

मुंबई महापालिका प्रशासनाच्या अखत्यारित सर्व विभाग आणि खाती येत असली तरी महापालिका चिटणीस आणि लेखापरिक्षक विभाग हे केवळ स्थायी समिती अध्यक्षांच्या अखत्यारित येणारे विभाग आहे. या विभागांमध्ये समिती अध्यक्षांच्या परवानगीनेच काम व्हायला हवी. परंतु कोरेानाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात कोरोनाची भीती घालून सरकारच्या मदतीने महापालिका आयुक्तांनी  महापालिका सभागृह तसेच स्थायी समितीसह इतर कोणत्याही समितींच्या सभा होणार नाही याची काळजी घेत लोकप्रतिनिधींना महापालिकेपासून दूर ठेवले.

- Advertisement -

मात्र, नगरविकास खात्याने या सभा घेण्याची स्थगिती उठवत व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे ही सभा घेण्याचे निर्देश दिले, तेव्हापासून या परिपत्रकाची तंतोतंत पालन करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त चंद्रशेखर चौरे यांनी दिल्या आहेत. तसेच यापूर्वीही आयुक्तांच्या सांगण्यानुसारच चिटणास विभागाचे कामकाज चालवले जात आहे. विशेष म्हणजे यापूर्वी कधीही चिटणीस खात्यामध्ये महापालिका आयुक्तांनी लक्ष घातलेले नाही तसेच कधी अशाप्रकारे लक्ष घालण्याची हिंमतही त्यांनी दाखवली नव्हती. महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक होत नसल्याने कोरोनासंदर्भात खर्च केलेल्या प्रस्तावांना मान्यता देण्याचे प्रस्तावही आयुक्त आणि त्यांचे उपायुक्त यांनी गटनेत्यांच्या सभेत ठेवण्याच्या नियमबाह्य सुचना चिटणीस विभागाला केल्या होत्या.

महापालिकेच्या अधिनियमांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे सभा घेण्याची कोणतीही तरतूद नाही. परंतु शासनाचे आदेशानुसारच कार्यवाही केली जावी, अशाप्रकारचे निर्देशच उपायुक्त चौरे यांनी दिले आहे. तसेच यासाठी लागणरी व्हिडीओ कॉन्फरन्सीची सुविधाही प्रशासनाने पुरवण्याची व्यवस्था करून देण्याची तयारी दर्शवली आहे. सध्या महापालिका चिटणीस आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या महापालिका आयुक्तांच्या कार्यालयातील वाढत्या वर्दळीमुळे चिटणीस खात्याचा कारभार हा स्थायी समिती अध्यक्षांच्या अखत्यारित आहे की आयुक्तांचा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisement -

हे ही वाचा- ऐश्वर्या- आराध्या बच्चनला रुग्णालयातून डिस्चार्ज, कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -