घरमुंबईअरबी समुद्रात बोटींची धडक

अरबी समुद्रात बोटींची धडक

Subscribe

लाखोंचे नुकसान, सात खलाशी सुखरुप

अरबी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या दोन बोटींची जोरदार टक्कर झाली. टकरीनंतर अपघातग्रस्त बोटींवरील सात जण समुद्रात पडले होते. मात्र, दुसर्‍या बोटीवरील खलाशांनी त्यांची सुखरुप सुटका केली.

उत्तन येथील मच्छिमार फ्रँकी पाटील यांच्या काँझिटा बोटीवर नाखवासह सात जण अरबी समुद्रात 25 नॉटिकल अंतरावर मासेमारी करीत होते. शनिवारी दुपारी जेवण करून सर्वजण आराम करीत होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या मढ नावाच्या बोटीने जोरदार धडक दिली. या अपघातात काँझिटा बोट अपघातग्रस्त होऊन समुद्रात बुडू लागली. तर सातही खलाशी समुद्रात फेकले गेले. अपघातापासून काही अंतरावर असलेल्या मासेमारी बोटींवरील खलाशांनी बुडत असलेल्या सर्व खलाशांना सुखरुप बाहेर काढले.

- Advertisement -

दुसर्‍या बोटींच्या मदतीने अपघातग्रस्त बोट आणि खलाशांना दुसर्‍या दिवशी उत्तनजवळील भोतोडी बंदरावर आणण्यात आले. अपघातग्रस्त बोट समुद्रकिनारी आल्यानंतर तिचा पंचनामा वेळेत केला गेला नाही. मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकारी अथवा कर्मचार्‍यांनी दखल घेतली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -