घरमुंबईरेल्वे मध्ये बोगस भरती, सावध राहण्याचे रेल्वे पोलीस आयुक्तांचे आवाहन

रेल्वे मध्ये बोगस भरती, सावध राहण्याचे रेल्वे पोलीस आयुक्तांचे आवाहन

Subscribe

दोन जागा कबड्डी खेळाडूंसाठी रिक्त ठेवण्यात आली होती.

रेल्वेमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून दोन खेळाडूंची फसवणूक करण्यात आली असल्याची धक्कादाय माहिती उघडकीस आली आहे. पश्चिम रेल्वेच्या कार्यलयातूनच केंद्र सरकारचे पत्र तसेच सही व शिक्क्यांसह बोगस नियुक्तीपत्र देऊन खेळाडूंची फसवणूक करण्यात आली आहे. या घटनेनंतर अज्ञात इसमा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन पुढील चौकशीचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे. तसेच या संपुर्ण घटनेचे गांभिर्य लक्षात घेता खेळाडू रेल्वे भरती प्रक्रियेचं रॅकेट सक्रिय असल्याची तसेच यात वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची भीती पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ‘कमर्शियल कम तिकिट क्लार्क’ या भरती पदासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागांसाठी बनावट नियुक्तीपत्र देत दोन खेळाडूंची नियुक्ती करण्यात आली असल्याचा अहवाल रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे पोलिसांना दिला आहे. दोन्ही खेळाडूंपैकी एक तरुण हा हरियाणाचा आहे. तसेच अशी कोणतीही रिक्त जागा अद्याप भरण्यात आली नसून रेल्वे कार्यलयातून कोणतेही नियुक्तीपत्र देण्यात आले नाहीये अशी माहिती समोर येत आहे. यानंतर शासकीय कार्यलयातील पत्राचा गैरवापर केल्याप्रकरणी अज्ञात इसमा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्त कैसर खालिद यांनी दिली आहे.

नेमकं काय झालं-

- Advertisement -

पश्चिम रेल्वेने ऑक्टोबर 2019 मध्ये 21 जागापैकी 2 राखीव जागेसह खेळाडू कोट्यातून ‘कमर्शियल कम तिकिट क्लार्क’ भरतीसाठी जाहिरात करण्यात आली होती. या जाहिरातीमध्ये दोन जागा कबड्डी खेळाडूंसाठी रिक्त ठेवण्यात आली होती. यासाठी संबधीत खेळाडूंनी अर्ज दाखल केला होता. तसेच 10 जानेवारी 2020 मध्ये भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती व त्यांची नावे प्रतीक्षा यादीत देण्यात आली. पुढील वर्षी म्हणजेच मार्च 2021 मध्ये त्यांना रेल्वेकडून एक पत्र मिळाले यानंतर नियुक्तीपत्रात 15 जूनला त्यांना चाचणीसाठी हजर राहण्याचे पत्रात नमूद करण्यात आले. खेळाडू 9 जुलै रोजी चर्चगेट मुख्यालयात त्यांची नावे कार्यालयात एका रजिस्टरमध्ये नोंदवण्यात आली. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांचे नाव नियुक्तीयादीमध्ये नसल्याची माहिती फोनवरून सांगण्यात आली.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पश्चिम रेल्वेच्या क्रिडा अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संबंधीत रेल्वे अधिकाऱ्याचा फोन बंद असल्याचे निदर्शनास आले.


हे हि वाचा – Corona Alert : राज्याला १५ धोक्याचे, छोटीशी चूक भयंकर ठरु शकते, मोदी सरकारचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -