Eco friendly bappa Competition
घर क्राइम महादेव ऑनलाइन गेमिंग अॅपमुळे बॉलिवूडचे 'हे' कलाकार ईडीच्या रडारवर

महादेव ऑनलाइन गेमिंग अॅपमुळे बॉलिवूडचे ‘हे’ कलाकार ईडीच्या रडारवर

Subscribe

महादेव ऑनलाइन गेमिंग अॅपच्या कंपनीवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. तब्बल 39 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहे. मुंबई, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश आणि इतर काही राज्यात महादेव ऑनलाइन गेमिंग अॅप कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात आले होते

मुंबई : महादेव ऑनलाइन गेमिंग अॅपच्या कंपनीवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. तब्बल 39 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहे. मुंबई, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश आणि इतर काही राज्यात महादेव ऑनलाइन गेमिंग अॅप कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मनी लाँड्रिंग प्रकरणात हे गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणामध्ये आता अनेक बॉलिवूडचे कलाकार हे ईडीच्या रडारवर असल्याचे सांगण्यात येत आहे. (Bollywood actors may be questioned by ED due to Mahadev online gaming app)

हेही वाचा – न्यायालयाचे निर्णय राजकारणाच्या दृष्टीने..; नक्षलवादी गौतम नवलखा केसबद्दल निवृत्त न्यायाधीशांचा खुलासा

- Advertisement -

महादेव ऑनलाइन गेमिंग अॅपच्या माध्यमातून करोडे रुपयांची देवाण-घेवाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये काही मोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटीजचाही समावेश आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महादेव गेमिंग अॅपचे प्रमोटर सौरभ चंद्राकार यांच्या लग्नसोहळ्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकार या लग्नसोहळ्यात उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. तर या अॅपचे प्रमोटर असलेले चंद्रकर हे या मनी लाँड्रिंग प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याने आणि त्यांच्याच लग्नाला बॉलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावल्याने आता ते कलाकारसुद्धा ईडीच्या रडारवर असल्याचे सांगितले जात आहे.

ईडीकडून मुंबईसह ज्या 39 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे, त्यामध्ये एकूण 417 कोटी रुपयांची रक्कम गोठविण्यात आली आहे. तर या प्रकरणात आता टायगर श्रॉफ, सनी लिओनी, आतिफ अस्लम, गायक राहत फतेह अली खान, अली अजगर, गायक विशाल ददलानी, गायिका नेहा कक्कड, एली एवराम, स्टँडअप कॉमेडीयन भारती सिंह, भाग्यश्री, पुलकित, किर्ती खबंदा, नुसरत भरुचा आणि कृष्णा अभिषेक यांची या प्रकरणात चौकशी असण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

बॉलिवूड सेलिब्रिटी आणि गायक मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या रडारवर आहेत. ईडीने कोलकाता, भोपाळ, मुंबई इत्यादी शहरांमध्ये महादेव ऑनलाईन गेमिंग अॅपशी जोडलेल्या मनी लाँड्रिंग नेटवर्कच्या विरोधात शोध घेतला असून या प्रकरणातील सर्व पुरावे मिळविले असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी 417 कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात आली असून गेल्या आठवड्यात ईडीने काळबादेवी येथील आठ अंगडियांच्या परिसराची झडती घेतली. या अंगडियाने काही महिन्यांपूर्वी महादेव बुक अॅप ऑनलाइन गेमिंग सट्टेबाजी फर्मच्या प्रवर्तकांना सुमारे 106 कोटी रुपयांची रोख शहरातील इव्हेंट मॅनेजमेंट फर्मला वितरित करण्यात मदत केली आहे.

- Advertisment -