Eco friendly bappa Competition
घर मुंबई नृत्य बघूनच माधुरी दीक्षितला चित्रपटासाठी केलं होतं साईन!

नृत्य बघूनच माधुरी दीक्षितला चित्रपटासाठी केलं होतं साईन!

Subscribe

सुभाष घई हे असे दिग्दर्शक आहेत ज्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. सुभाष घई यांनी केवळ उत्तम चित्रपटच दिले नाही तर त्यांनी अनेक अभिनेत्रींचे करिअर बनवण्यासाठीही ते प्रसिद्ध होते. महिमा चौधरीपासून ते माधुरी दीक्षितपर्यंत अनेक अभिनेत्रींचे करिअर घडवण्यात सुभाष घई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. एका शो दरम्यान माधुरी दीक्षितने तिच्या आणि सुभाष घईच्या पहिल्या भेटीचा किस्सा शेअर केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

- Advertisement -

माधुरी दीक्षितची कारकीर्द पुढे नेण्यात सुभाष घई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सुभाष घई हे दिग्दर्शक होते, ज्यामुळे माधुरी दीक्षितची वेगळीच ओळख निर्माण झाली. माधुरी दीक्षित काश्मीरमध्ये पहिल्यांदा सुभाष घई यांना भेटली. माधुरी दीक्षितला इथे पाहून तिला थेट चित्रपटासाठी कास्ट करण्याचे ठरवले. वास्तविक माधुरी दीक्षितने खुलासा केला होता की, तिच्या केशभूषाकाराने तिचे फोटो सुभाष घई यांच्याकडे नेले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

- Advertisement -

त्यावेळी सुभाष घई काश्मीरमध्ये ‘कर्मा’ चित्रपटाचे शूटिंग करत होते. माधुरी दीक्षित त्यावेळी ‘आवारा बाप’च्या शूटिंगमध्ये ती व्यस्त होती. फोटो पाहिल्यानंतर सुभाष घईंनी तिला बोलावले आणि माधुरीला विचारले की, तू नाचशील का? त्या वेळी सरोज खानही तेथे उपस्थित होत्या. सुभाषजींनी माधुरीला त्यांना भेटायला बोलवले. यावेळी दिग्दर्शक सोहनलाल कंवर यांनी माधुरीचे भरभरून कौतुक केले. हा किस्सा सांगताना केवळ नृत्य बघूनच मला साईन करण्यात आल्याचं माधुरी दिक्षीतने सांगितले आणि माझ्या करिअरमध्ये सुभाष घईंचा मोठा वाटा असल्याचेही तिने यावेळी सांगितले.


नवव्या महिन्यात नेहा धुपियाने केलं बोल्ड अंदाजात मॅटरनिटी शूट
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -