घरताज्या घडामोडीकरण जोहरच्या पार्टी व्हिडिओचं सत्य उघडं, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये झाला खुलासा

करण जोहरच्या पार्टी व्हिडिओचं सत्य उघडं, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये झाला खुलासा

Subscribe

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता ड्रग्ज कनेक्शन जोडले गेले आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीतील ड्रग्ज कनेक्शन संबंधित अनेक खुलासे होताना दिसत आहे. तसेच बॉलिवूडची मोठी नावे एनसीबीच्या रडारवर आहेत. दरम्यान या प्रकरणा संबंधित दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांची चौकशी झाली. आता या प्रकरणात करण जोहरच्या पार्टीचा देखील उल्लेख केला जात आहे. या पार्टीत असलेल्या सेलिब्रिटींनी ड्रग्जचे सेवन केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे सध्या एनसीबीची नजर या पार्टीवर आहे. दरम्यान चौकशीत एक नवीन खुलासा झाला आहे. त्यानुसार स्पष्ट झाले आहे की, ‘पार्टी दरम्यानचा हा व्हिडिओ खरा असून एडिटेड केलेला नाही आहे.’ याबाबतचे वृत्त आजतकने दिले आहे.

सुत्रानुसार, २०१९ रोजी झालेल्या करण जोहरच्या पार्टीचे फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आले असून ते एनसीबीने ते सबमिट केले आहेत. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये खुलासा झाला आहे की, ‘हा व्हिडिओ खरा असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे एडिटिंग करण्यात आले नाही आहे.’ यासंदर्भात एक बैठक घेतली जाणार आहे. जी मल्होत्रा आणि डीडीजी अशोक जैन यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाईल की, या प्रकरणात पुढील कारवाई काय होईल.

- Advertisement -

दरम्यान यापूर्वी करण जोहर म्हणाला की, ‘मी ड्रग्ज घेत नाही आणि मी ते कोणालाही देतही नाही. २८ जुलै २०१९ रोजी झालेल्या माझ्या पार्टीत ड्रग्ज वापर केला जात असल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. २०१९ साली मी हे आरोप खोट असल्याचे सांगितले होते.’

पुढे करण जोहर म्हणाला की, ‘क्षितिज आणि अनुभवला मी ओळखत नाही. दोघेही धर्मा प्रोडक्शनचे अधिकारी नाही आहेत. नोव्हेंबर २०१९मध्ये क्षितिज कॉन्ट्रॅक्ट बेसवर होता. अनुभवने धर्मा प्रोडक्शनमध्ये अवघ्या दोन महिन्यांपर्यंत काम केले आहे.’ करण यासर्व प्रकरणाबाबत कायदेशी कारवाई करण्याबाबतही बोलला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचे निर्माता क्षितीज प्रसाद अटकेत; NCB ची कारवाई


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -