घरक्राइमBollywood Drugs Case: सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला एनसीबीकडून अटक

Bollywood Drugs Case: सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला एनसीबीकडून अटक

Subscribe

सिद्धार्थने केले धक्कादायक खुलासे

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अंमलीपदार्थविरोधी पथकाने (NCB) मोठी कारवाई केली आहे. NCB ने सुशांतसिंह राजपूतचा रुममेट आणि मित्र सिद्धार्थ पिठानी याला अटक केली आहे. सिद्धार्थल हैदराबादमधून ताब्यात घेण्यात आले असून लवकरच त्याला मुंबईत आणणार असल्याची माहिती मिळत आहे. याआधीही अनेकदा एनसीबीकडून सिद्धार्थची चौकशी करण्यात आली होती. सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज दिल्याच्या कटात सिद्धार्थ पिठानीचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. सिद्धार्थला आज कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. हैद्राबाद न्यायालयात त्याला हजर केल्यानंतर न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सिद्धार्थच्या घरात आक्षेपार्य इलेक्ट्रोनिक्स पुरावे
सापडली असून षडयंत्र रचण्यासह एनडीपीएस कायद्याच्या (NDPS Act) कलम २७, २८ आणि २९ अंतर्गत त्याच्यावर विविध आरोप ठेवण्यात आले आहेत.

आता पर्यंत ३ वेळा सिद्धार्थला समन्स बजावला होता. सुशांत सिंग प्रकरणातील ही ३५ वी अटक आहे. सुशांत सिंगच्या ड्रीम टीम मधील प्रमुख होता सिद्धार्थ पिठानी सुशांतला अंमली पदार्थ पोहोचवत होता असा आरोप त्याच्यावर असल्याची माहिती सूञांनी दिली आहे. या प्रकरणात सिद्धार्थ हा महत्वाचा संशयित होता. NCB ने वारंवार समन्स बजावले होते. माञ तो उत्तर देत नव्हता आणि चौकशीलाही समोर येत नव्हता. मागील अनेक दिवसापासून NCB सिद्धार्थच्या शोधात होते. अखेर सिद्धार्थ हैद्राबाद येथे सिद्धार्थ अंडरग्राऊंड होता याची माहिती NCB ला मिळाली आणि त्याला ताब्यात घेण्यात आले.

- Advertisement -

१४ जून २०२० रोजी मुंबईतल्या राहत्या घरी सुशांतचा मृतदेह आढळला. त्याच्या मृत्यूप्रकरणातील ड्रग्ज अँगलचा तपास सध्या एनसीबीकडून सुरु आहे. या प्रकरणात सिद्धार्थ पिठानी हे नाव वारंवार समोर येत होते. सिद्धार्थ हा सुशांतचा जवळचा मित्र आणि रुममेट असल्याचं सांगितलं जातं. त्यासोबतच तो सुशांतचा क्रिएटिव्ह कंटेट मॅनेजर म्हणून काम करत होता. याआधीही एनसीबीने सिद्धार्थ पिठानी, रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, स्टाफ दिपेश सावंतसहीत बऱ्याच जणांना अटक केली होती. यावेळी चौकशीदरम्यान सिद्धार्थने काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

- Advertisement -

सिद्धार्थने केले धक्कादायक खुलासे

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीत सिद्धार्थ पिठानीने सुशांतची बहीण मितू सिंह, प्रियंका, तिचे पती ओपी सिंह या तिघांची नावं घेतली होती. तसेच सुशांतच्या आत्महत्येची माहिती मितू आणि प्रियंकानेच त्याला दिली असल्याचा दावा केला. प्रियंका आणि मितूच्या बोलण्यावरून सुशांतचा मृतदेह फासावरुन खाली उतरवल्याचाही खुलासा सिद्धार्थने केला. दीपेशच्या मदतीने पंख्याला लटकलेला सुशांतचा मृतदेह खाली काढला असेही सिद्धार्थने सीबीआयला सांगितले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -