घरताज्या घडामोडीParag Sanghvi: बॉलिवूड सिने निर्माता पराग संघवीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक

Parag Sanghvi: बॉलिवूड सिने निर्माता पराग संघवीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक

Subscribe

न्यायालयाने संघवीला २५ डिसेंबरपर्यंत पोलीस ईओडब्ल्यू कोठडी सुनावली

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बॉलीवूड चित्रपट निर्माते पराग संघवी याला फसवणूक केल्या प्रकरणी अटक केली. न्यायालयाने संघवीला २५ डिसेंबरपर्यंत पोलीस ईओडब्ल्यू कोठडी सुनावली आहे. आ गु वि गु नों क्र १०९/२०१८, कलम ४०९,४२०,४६५,४६७,४७१,१२०(ब),३४ भा दं वि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३,७४,००,००० रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप पराग संघवीवर करण्यात आला आहे. महेंद्र राणमल शाह यांनी पराग संघवीवर हे आरोप केले आहेत. पराग संघवी हा बॉलिवूडमधील सिने निर्मिता आहेतच मात्र त्याचबरोबर अलुमब्रा आणि लोट्स फिल्म कंपनीचा ते सीईओ देखील आहे. भूतनाथ रिटर्न्स, द अटॅक ऑफ २६/११ या सिनेमांची त्यांनी निर्मिती केली आहे. कमला मिल ग्रुप ऑफ कंपनीच्या संबंधीत एका प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

यातील फिर्यादी यांनी महेंद्र राणमल शाह  २०१३ मध्ये कमला लँडमार्क ग्रुपच्या सिस्टर्स कम्पनी नामे कमला लँडमार्क इन्फ्रा आणि कमला लँडमार्क प्रॉपर्टीज यांचेकडून टर्नर रोड, बांद्रा, मुंबई याठिकाणी ३ व्यावसायिक फ्लॅट खरेदी केले होते. सदर फ्लॅट मधील एक फ्लॅट फिर्यादी यांनी कमला लँडमार्क ग्रुपच्या सिस्टर्स कम्पनी आणि आरोपी जितेंद्र रमेश जैन व पराग मधुसूदन संघवी संचालक असलेल्या मे अलुमब्रा इंटरटेन्मेंट अँड मीडिया प्रा लिमिटेड या कंपनीस तसेच इतर दोन फ्लॅट मे मेटालिका प्रा लि या कंपनीला भाडोत्री दिले होते. सदरचे फ्लॅट भाडोत्री तत्वावर असताना कमला लँडमार्क ग्रुपच्या मे कमला लँडमार्क प्रॉपर्टीज या कंपनीने ते त्रयस्थ बळीत यांना विकले.


हेही वाचा – पनामा पेपर लीक प्रकरणी बिग बींनी ऐश्वर्यावरील आरोपांचा केला खुलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -