घरमनोरंजनविलेपार्ले स्मशानभूमीत संध्याकाळी ४ वाजता सुशांतवर होणार अंत्यसंस्कार

विलेपार्ले स्मशानभूमीत संध्याकाळी ४ वाजता सुशांतवर होणार अंत्यसंस्कार

Subscribe

सुशांतचे वडील आमदार नीरज बबलू यांच्यासह इतर दोन सदस्य सुशांतच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईला दाखल झाले आहेत.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी मुंबईत आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण बॉलिवूड विश्वतर हादरलंच पण सामान्य माणसांपैकी सुशांतच्या चाहत्यांना देखील त्याच्या अचानक एक्झीटने मोठा धक्का बसला. मुंबईतील विलेपार्ले स्मशानभूमीत संध्याकाळी ४ वाजता सुशांतच्या पार्थिवावरअंत्यसंस्कार केले जाणार आहे. सुशांतवर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती सुशांतचा कौटुंबिक मित्र निशांत जैनने दिली आहे. सुशांतचे वडील, केके सिंह यांच्यासह इतर दोन सदस्य सुशांतच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईला दाखल झाले आहेत.

मुंबईत आज सुशांतवर अंत्यसंस्कार होणार असल्याने त्याचे वडील केके सिंह आणि पाटणा इथला चुलत भाऊ आणि सुपौलचे भाजप आमदार नीरज कुमार बाबूल यांच्यासह अन्य दोन सदस्य सकाळीच विमानाने मुंबईला रवाना झाले. त्याच्या कुटुंबापैकी वडिल हजर असतील तर सुशांतच्या आईचे २००२ मध्ये निधन झाले. याशिवाय त्याला चार बहिणी देखील आहेत, त्यापैकी एक मीटू सिंग राज्यस्तरीय क्रिकेटपटू असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा खून झाला आहे, तो आत्महत्या करू शकत नाही. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी जन अधिकार पार्टीचे प्रमुख पप्पू यादव यांनी केली. सुशांतचे कुटुंब राहत असलेल्या पटणा येथील निवासस्थानी त्यांनी अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली.

- Advertisement -

असा घडला प्रकार

रविवारी सुशांतने दुपारी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतसिंग राजपूतने शनिवारी आपल्या काही जवळच्या मित्रांना घरी जेवणासाठी आमंत्रित केले होते. रात्री पार्टीला उशीर झाल्यामुळे सर्वजण उशिरा झोपले होते. सुशांतसिंग हा देखील त्याच्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. दुपार होऊन देखील सुशांत झोपेतून जागा झाला नाही म्हणून काही मित्रांनी त्याचे बेडरूमचे दार ठोठावले मात्र आतून दार बंद होते. बराच वेळ झाल्याने आतून काही प्रतिक्रिया येत नसल्यामुळे अखेर दार तोडून मित्रांनी आत प्रवेश केला. यावेळी सुशांतसिंगने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला.

६ महिन्यांपासून नैराश्यावर उपचार सुरू

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत हा गेल्या काही दिवसांपासून नैराश्यग्रस्त झाला होता. त्याच्यावर स्पेशल डॉक्टरांकडे उपचार सुरू होता. घरातून त्याच्या वैद्यकीय उपचाराची कागद पत्र आढळून आली आहे. यावरून सुशांतला नैराश्याने ग्रासले होते, व त्याच्यावर मागील सहा महिन्यांपासून उपचार सुरू होते, अशी माहिती सध्या समोर आली आहे.


बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने केली आत्महत्या!

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -