घरताज्या घडामोडीब्रेकिंग: मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी, रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा वाढवली

ब्रेकिंग: मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी, रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा वाढवली

Subscribe

दुबईतील व्यक्तीने दिलेल्या माहितीनंतर शहरात अ‍ॅलर्ट

मुंबई शहरात बॉम्बस्फोट होणार असल्याचा कॉल दुबईतून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या व्यक्तीने दिलेल्या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी सर्वत्र अ‍ॅलर्ट जारी केले आहे. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्वच पोलिसांना सतर्कचा इशारा देताना परिसरात जास्तीत जास्त कोम्बिंग ऑपरेशन करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहे.

- Advertisement -

हितेश नावाचा एक व्यक्ती कांदिवली परिसरात राहत असून सध्या तो नोकरीनिमित्त दुबई येथे वास्तव्यास आहे. शनिवारी दुपारी त्याने दुबईहून वांद्रे रेल्वे पोलिसांच्या दूरध्वनी क्रमांक ०२२२२६४२२०४७ या क्रमांकावर कॉल केला. त्याने स्वत:ची ओळख सांगून तसेच त्याची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर त्याने जावेद नावाचा एक व्यक्ती मुंबईत बॉम्बस्फोट घडविणार आहे. आगामी दिवसांत कधीही मुंबईत बॉम्बस्फोट होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी योग्य ती काळजी घ्यावी, तसेच त्याचे नाव गुपित ठेवावे अशी विनंती केली.

या माहितीनंतर वांद्रे रेल्वे पोलिसांनी ही माहिती मुंबई पोलिसाच्या मुख्य नियंत्रण कक्षासह रेल्वे नियंत्रण कक्षाला दिली होती. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत सर्वच पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. परिसरात जास्तीत जास्त कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी करा. संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा. एटीएसलाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून शहरात अशा प्रकारे घातपात होणार आहे का याची काही सूचना गुप्तचर विभागाकडून प्राप्त झाली आहे याची शहानिशा सुरु आहे.

- Advertisement -

दरम्यान या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे तर मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकाची श्वान पथकाच्या मदतीने शनिवारी कसून तपासणी करण्यात आली होती.


हेही वाचा –  Mumbai Vaccination: कोविडमुक्त मुंबईच्या दिशेने एक पाऊल पुढे! १०० टक्के लोकांनी घेतला पहिला डोस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -