घरमुंबईअभिनेत्री मौसमी चॅटर्जीला हायकोर्टाचा दिलासा

अभिनेत्री मौसमी चॅटर्जीला हायकोर्टाचा दिलासा

Subscribe

ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. मौसमी यांना त्यांच्या मुलीशी संबंधित वैद्यकीय कागरपत्रं पोहोचवण्याचे आदेश कोर्टाने जावई डिकी सिन्हा यांना दिले आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. मौसमी यांना त्यांच्या मुलीशी संबंधित वैद्यकीय कागरपत्रं पोहोचवण्याचे आदेश कोर्टाने जावई डिकी सिन्हा यांना दिले आहेत. मौसमी चॅटर्जी यांनी मुलगी पायल सिन्हा कोमात असून जावयाने तिची भेट घेऊ न दिल्याचा आरोप मौसमी यांनी केला होता. यासंबंधीची याचिका त्यांनी हायकोर्टात दाखल केली होती. मौसमी आणि त्यांचे पती जयंत मुखर्जी यांनी लावलेले आरोप तथ्यहीन असल्याचा दावा डिकी सिन्हा यांनी केला आहे. पत्नीची भेट घेण्यापासून सासू-सासऱ्यांना कधीही थांबवलं नसल्याचं डिकीने म्हटलं आहे. तसेच ज्या दिवशी याचिका दाखल केली, त्याच दिवशी दोघेही तिला भेटले असल्याचा दावा डिकीने केला आहे. त्याचा सीसीटीव्ही फुटेज हा पुरावा असल्याचे त्यांनी सांगितले.

डिकीने दिली कोर्टाला माहिती 

डिकी सिन्हाने कोर्टासमोर सांगितले की, यापुढे जेव्हा-जेव्हा मौसमी आणि जयंत यांना मुलीची भेट घ्यायला यायचं असेल, त्यांनी खुशाल यावं. पती म्हणून मी पायलची व्यवस्थित काळजी घेत आहे. देखभालीसाठी प्रशिक्षित नर्सही ठेवली आहे. कोर्टाने दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकल्यानंतर हे प्रकरण परस्पर सामंजस्याने सोडवण्याचे आदेश दिले. कुठलाही आक्षेप असल्यास पुन्हा कोर्टाचे दरवाजे ठोठावू शकता, असेही कोर्टाने सांगितले.

- Advertisement -

२०१७ पासून पायल कोमात

दरम्यान, मौसमी चॅटर्जीची मुलगी पायल सिन्हा ही २०१७ पासून कोमात केली असून एप्रिल २०१८ मध्ये त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतरपासून ती पतीच्या म्हणजेच डिकीच्या घरी राहत आहे. २०१० साली पायल आणि डिकी यांचा विवाह झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -