Maharashtra Assembly Election 2024
घरमुंबईAkshay Shinde Encounter : आम्हाला निष्पक्ष चौकशी अपेक्षित; न्यायालयाने सीआयडीवर ओढले ताशेरे

Akshay Shinde Encounter : आम्हाला निष्पक्ष चौकशी अपेक्षित; न्यायालयाने सीआयडीवर ओढले ताशेरे

Subscribe

न्यायमूर्तींनी आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित चकमकीच्या तपासातील त्रुटींवर ताशेरे ओढले आहेत. तसेच राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) गंभीर नाही म्हणत तपास पूर्ण करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.

मुंबई : बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर ऑगस्ट महिन्यात अत्याचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणई त्याच शाळेतील सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदे या आरोपीला पोलिसांनी चकमकीत ठार केले. याप्रकरणी आता उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून न्यायमूर्तींनी आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित चकमकीच्या तपासातील त्रुटींवर ताशेरे ओढले आहेत. तसेच राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) गंभीर नाही म्हणत तपास पूर्ण करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. (Bombay High Court draws attention to CID investigation into Akshay Shinde alleged encounter case)

अक्षय शिंदे चकमक प्रकरणी चौकशीसाठी आवश्यक पुरावे गोळा करण्यात विलंब झाल्याबद्दल न्यायालयाने सीआयडीला फटकारले. खंडपीठाने म्हटले की, आमचा प्रयत्न सत्य उघड करण्याचा आणि निष्पक्ष तपास सुनिश्चित करण्याचा आहे. जर सीआयडीने मॅजिस्ट्रेटला सर्व साहित्य पुरवले नाही तर तपास कसा होणार? तुम्ही उशीर का करत आहात? अक्षय शिंदेचा मृत्यू चकमकीत झाला की नाही हे ठरवण्याची दंडाधिकाऱ्यांची भूमिका आहे आणि योग्य सामग्रीशिवाय ते कोणतीच भूमिका घेऊ शकत नाहीत. त्यामुळे खंडपीठाने सीआयडीला आपला तपास पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच दोन आठवड्यांच्या आत दंडाधिकाऱ्यांकडे सर्व संबंधित साहित्य सादर करावे असेही म्हटले. याप्रकरणी पुढील सुनावणी 2 डिसेंबरला होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Vinod Tawde : पैशाचे सर्व आरोप खोटे, त्याबाबत एकही गुन्हा दाखल नाही; काय म्हणाले विनोद तावडे?

दरम्यान, सुनावणीवेळी न्यायालयाने फॉरेन्सिक अहवालाचा आढावा घेतला असता त्यांना त्यात विसंगती आढळून आली. शिंदे याने पोलिसांचे पिस्तुल हिसकावून त्यातून पोलिसांवर तीन गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर पोलिसांनी प्रत्युतरादाखल केलेल्या गोळीबारात तो ठार झाला, असा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र अक्षय शिंदे याने गोळ्या झाडल्यानंतर त्याच्या हातावर त्याबाबतच्या खुणा आढळून आल्या नाहीत. याशिवाय, त्याला गोळीबाराआधी पाणी पिण्यासाठी बाटली देण्यात होती. मात्र त्या बाटलीवरदेखील त्याच्या हाताचे ठसे आढळून आले नाहीत. हा सगळा प्रकार असामान्य असल्याची टिप्पणीही खंडपीठाने केली.

- Advertisement -

हेही वाचा – Uddhav Thackeray : विनोद तावडे तावडीत सापडले असतील तर…; ठाकरेंचा भाजपावर निशाणा


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -