घरताज्या घडामोडीशीना बोरा हत्याकांड : पीटर मुखर्जीला जामीन तर मिळाला, पण...

शीना बोरा हत्याकांड : पीटर मुखर्जीला जामीन तर मिळाला, पण…

Subscribe

शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जीला मुंबई उच्च न्यायालयाने तब्बल ४ वर्षांनी जामीन मंजूर केला आहे.

शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गेल्या चार वर्षांपासून पीटर तुरुंगात होते. दरम्यान, पीटरची आज २ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी पुरावा नसल्याचे नोंदवून जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. मात्र, कोर्टाच्या परवानगी विना देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात सीबीआयने विरोध दर्शवल्याने न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी निर्णयाला सहा आठवड्यांनी स्थगिती दिली आहे.

- Advertisement -

यापूर्वी नाकारण्यात आला होता जामीन

शीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जीची जामिनावर सुटका करण्यास २०१६ साली विशेष न्यायालयाने सोमवारी नकार दिला होता. दरम्यान, ही केस डायरीत नमूद करण्यात आलेल्या बाबी लक्षात घेत विशेष महिला न्यायालयाच्या न्या. एच. एस. महाजन यांनी जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आज पीटर मुखर्जीला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

शीना बोरा हत्याकांड प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या पीटर मुखर्जीने बायपास सर्जरी झाल्यानंतर तुरुंगात आजारपण बळावण्याची शक्यता असल्याने आपल्याला वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळावा म्हणून कनिष्ठ न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर पीटरच्या वतीने वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. या अर्जावर सुटीकालीन न्यायालयाचे न्यामूर्ती रियाझ छागला यांच्यासमोर सुनावणी झाली. मात्र, सीबीआयच्या वतीने Adv. इझाज खान यांनी जोरदार विरोध करत वैद्यकीय कारण देत तुरुंगातून सुटका करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोले गेले होते. तसेच तुरुंगात वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहे. त्यामुळे जामीन देण्याची गरज नाही, असा दावा देखील करण्यात आला होता. त्यानंतर कारागृहात हार्टचा रुग्ण असल्याने संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसेच कारागृहात कार्डियाकचे स्पेशालिस्ट नाही. त्यामुळे जामीन देण्यात यावा, अशी विनंती देखील करण्यात आली. दरम्यान, आज पीटर मुखर्जीला जामीन देण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईतील तीन बडे बिल्डर ईडीच्या रडारवर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -