घरमुंबईअबू सालेमला लग्नाचे डोहाळे,पण हायकोर्टाने नाकारला पॅरोल

अबू सालेमला लग्नाचे डोहाळे,पण हायकोर्टाने नाकारला पॅरोल

Subscribe

अंडरवर्लंड डॉन अबू सालेम याने मुंबई उच्च न्यायालयाकडे लग्न करण्यासाठी ४५ दिवसांची पॅरोल रजा मागितली होती. त्यासाठी त्याने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सालेमचा हा अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला.

१९९३ च्या बॉम्बब्लास्ट प्रकरणातील आरोपी अबू सालेम याला लग्नासाठी ४५ दिवसांची पॅरोल सुट्टी हवी होती, परंतु हा पॅरोल अर्ज हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याच्या ४५ दिवसांच्या पॅरोल सुट्टीच्या संदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने आज सुनावणी घेतली. या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. १९९३ च्या बॉम्ब ब्लास्ट मधील अबू सालेम याची भूमिका आणि त्याच्यावर पोर्तुगाल येथे असलेला बनावट पासपोर्ट प्रकरणाचा सुरू असलेला खटला लक्षात घेता ही याचिका फेटाळण्यात आली आहे.

नवी मुंबई पोलीसांनीदेखील फेटाळला अर्ज

या आगोदर अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याने एप्रिल महिन्यात आपण लग्न करणार असून त्यासाठी त्याला सुट्टीची गरज असल्याने त्याने तळोजा कारागृहाच्या प्रशासनाकडे ४५ दिवसांच्या पॅरोल च्या रजेसाठी केलेला अर्ज नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी फेटाळला होता. त्यानंतर अबू सालेमच्या वकिलांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. परंतु न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला आहे.

- Advertisement -

मुंब्र्यातील मुलगी केली पसंत

मुंब्रा परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय कौसर बहार या तरुणीशी त्याला निकाह करायचा असून यासाठी त्याने पॅरोल रजेचा अर्ज केला होता.अबु सालेम याला एका प्रकरणात पोलीस बंदोबस्तात लखनौ येथील न्यायालयात नेत असताना फोनवर त्याचा विवाह कौसर बहार हिच्याशी झाल्याचा दावा त्याने केला आहे. अबू सालेम उर्फ़ अबू सलेम अब्दुल कयूंम अन्सारी ह्याच्या वर दहशतवादी कारवाया आणि १९९३ च्या बॉम्ब ब्लास्ट संदर्भात गुन्हा दाखल असून याबरोबरच पोर्तुगाल देशात त्याच्यावर बनावट पासपोर्टचा गुन्हा दाखल आहे

चिकन मटनाची मागणी

काही दिवसांपूर्वी तुरुंगात मिळत असलेल्या जेवणामुळे आपली तब्येत चांगली होत नसल्याने त्याने चिकन,मटण बिर्याणीची मागणी केली होती. त्यानंतर लगेचच त्याला लग्नासाठी ४५ दिवसांची सुट्टी हवी होती. पण हायकोर्टाने त्याचा पॅरोल अर्ज फेटाळल्यामुळे आता लग्नाची इच्छा अपुरीच राहील, असे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -