मुंबई : नवऱ्याने आपल्या मनाविरोधात जबरदस्तीने खोलीत येऊन आपल्याशी वाद घातला, असा आरोप एका महिलेकडून करण्यात आला होता. याविरोधात तिने 26 फेब्रुवारी 2024 रोजी एफआरआय सुद्धा दाखल केली. ज्यानंतर पोलिसांनी याबाबत पतीविरोधात कलम 506 लावावे, अशी विनंती सुद्ध केली होती. त्यामुळे हे प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले. ज्यानंतर पतीने दाखल केलेली याचिका मंगळवारी (ता. 07 जानेवारी) अखेरीस न्यायालयाने फेटाळून लावली. (Bombay High Court says on Wife accuses husband of molestation case)
मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची 7 जानेवारीला सुनावणी पार पडली. यावेळी पत्नीचा छेडछाड केल्याचा आरोप असलेल्या पतीविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तर, सुनावणीवेळी न्यायालयाकडून सांगण्यात आले की, आम्हाला वाटत नाही की एखादा छोटा खटला चालवून हे जाणून घेता येईल की, एफआरआयमध्ये नोंदविण्यात आलेल्या सर्व गोष्टी या पूर्णतः खोट्या आहेत आणि त्यामुळे पत्नीकडून नोंदविण्यात आलेली एफआरआय रद्द करण्यात आली पाहिजे. ज्यामुळे पतीकडून हे आरोप खोटे असल्याबाबतची जी याचिका दाखल करण्यात आली आहे, ती फेटाळून लावत असल्याचे न्यायालयाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.
हेही वाचा… SC on Same Sex Marriage : समलैंगिक विवाहाला मान्यता नाहीच, सुप्रीम कोर्ट निर्णयावर ठाम
लाईव्ह लॉने दिलेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारी 2024 रोजी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये पत्नीने आरोप केला आहे की, तिचा पती जबरदस्तीने तिच्या बेडरूममध्ये घुसला आणि त्याने तिच्याशी वाद घातला. यामुळे तिने तिच्या पतीविरुद्ध कलम 506 लावण्याची पोलिसांकडे विनंती केली. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पती पुन्हा तिच्या खोलीत जबरदस्तीने घुसला आणि यावेळी त्याने तिच्या परवानगीशिवाय शौचालयाचा वापर केला. ज्यानंतर या दोघांमध्येही वाद झाला. पण जेव्हा पत्नीने या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पतीने फोन हिसकावून घेतला आणि तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. पण हे सर्व काही तिच्या परवानगीशिवाय घडत होते आणि ज्यामुळे तिला अपमानित झाल्यासारखे वाटले. पण तिचा पती इतक्यावरच थांबला नाही तर त्याने तिला स्वयंपाकघरात जाऊन मारहाण केल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आला आहे.
या प्रकरणाची तक्रार महिलेने पोलिसात केल्यानंतर याविरोधात पतीकडून याचिका दाखल करण्यात आली. त्याने याचिकेत असे म्हटले आहे की, दोघेही त्यांच्या 10 वर्षांच्या मुलासह एकाच घरात राहतात, परंतु वैवाहिक वादामुळे पत्नी मुलासह बेडरूममध्ये झोपते आणि पती बैठकीच्या खोलीत झोपतो. पतीचा आरोप आहे की, त्याच्याविरुद्ध दाखल केलेली एफआयआर ही चुकीची आहे. पत्नीने खोटी कथा रचून पोलिसांना खोटे जवाब दिले असल्याचा आरोप पतीने या याचिकेतून केला होता. ज्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने पतीची याचिका फेटाळून लावली.