Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम पत्नीच्या 'या' व्यसनामुळे मागितला पतीने घटस्फोट

पत्नीच्या ‘या’ व्यसनामुळे मागितला पतीने घटस्फोट

पत्नीला असलेल्या व्यसनामुळे पतीने पत्नीकडे घटस्फोटाची मागणी केली आहे.

Related Story

- Advertisement -

पती-पत्नीचे नाते खूपच संवेदनशील असते. संसाराचा गाढा ओढताना बऱ्याचदा संसारात भांडणे होतात. तर संसारात भांडण होण्याचे मुख्य कारण व्यसनही असते. व्यसनामुळे बरेच संसार मोडलेले आपण पाहिले आहेत. असच एक प्रकरण समोर आले आहे. पत्नी तंबाखूचा मावा खाते या कारणास्तव घटस्फोट मागितल्याची घटना समोर आली आहे. मात्र, मावा खाण्याचे व्यसन गंभीर असले तरी या कारणास्तव घटस्फोट मंजूर केला जाऊ शकत नाही, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पतीला फटकारले आहे.

पतीकडून आरोपांची सरबत्ती

नागपूरचे रहिवासी शंकर आणि रिना यांचे २००३ साली लग्न झाले होते. त्यानंतर सुरुवातीचे काही दिवस त्यांचा संसार आनंदाने सुरु होता. मात्र, त्यानंतर संसारात भांडण होण्यास सुरुवात झाली. पतीने केलेल्या आरोपांमध्ये रिना घरातील कामे करत नाही. सतत शुल्क कारणावरुन वाद घालते. तसेच उठसुट सासरी न सांगता माहेरी जाते. एक-एक महिना सासरी परत येत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला दररोज डबा देखील करुन देत नाही, असे एक ना अनेक आरोप पतीने रिनावर केले. त्यानंतर त्यांनी तिच्यावर एक गंभीर आरोप केला. त्यात तो म्हणाला की, “माझी पत्नी रिना हिला मावा खाण्याचे व्यसन आहे. या व्यसनामुळे तिला पोटाचा आजार झाला होता. या आजारावर उपचार करण्यासाठी महागडा खर्च करावा लागला होता”, असा दावा शंकरने त्याच्या याचिकेत केला होता.

याचिका फेटाळली

- Advertisement -

शंकरने केलेले इतर आरोप सर्व किरकोळ असून हे वाद संसारात होत असतात. मावा खाणे हा गंभीर आरोप असला तरी याकरता पत्नीला घटस्फोट देणे योग्य नाही, असे सांगत उच्च न्यायालयाने पतीची याचिका फेटाळली.

दुसऱ्यांदा फेटाळली याचिका

शंकरने याआधी देखील कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. शंकर आणि रिना यांना दोन मुले असून मुलगी शंकरसोबत तर मुलगा रिनासोबत राहत आहेत. मुलांच्या हितासाठी लग्न टिकून राहणे गरजेचे असल्याची भूमिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – बँक ऑफ महाराष्ट्रासह या चार बँकांचं होणार खासगीकरण


 

- Advertisement -