Homeक्राइमRobbery : ज्वेलर्स चोरीप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक; आरोपीकडून बहुतांश सोन्या-चांदीचे दागिने जप्त

Robbery : ज्वेलर्स चोरीप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक; आरोपीकडून बहुतांश सोन्या-चांदीचे दागिने जप्त

Subscribe

दागिने खरेदीचा बहाणा करून रिषभ ज्वेलर्समध्ये दरोडा घालून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आग्रीपाडा पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना यश आले आहे.

मुंबई : दागिने खरेदीचा बहाणा करून रिषभ ज्वेलर्समध्ये दरोडा घालून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आग्रीपाडा पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. संतोषकुमार आणि विनोद लखन पाल अशी या दोघांची नावे असून या दोघांनाही मध्यप्रदेश-उत्तरप्रदेशातून पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा बहुतांश सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. (both accused arrested in rishabh jewelers theft case most of the gold and silver ornaments were seized from the accused)

या प्रकरणातील तक्रारदार चिंचपोकळी येथे राहत असून ते सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी आहेत. त्यांचा भायखळा येथील सातरस्ता परिसरात रिषभ ज्वेलर्स नावाचे एक दुकान आहे. रविवारी दुपारी तीन वाजता ते त्यांच्या दुकानात होते. याच दरम्यान तिथे दोन तरुण सोन्याचे दागिने खरेदीसाठी आले होते. या दोघांना दागिने दाखवत असताना अचानक त्यांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. शिवीगाळ करत त्यांना बेदम मारहाण केली. त्यांचे हातपाय बांधून दुकानातील 2458 ग्रॅम वजनाचे सोन्याचे, 2200 ग्रॅम चांदीचे विविध दागिने आणि पंधरा हजारांची कॅश असा 1 कोटी 93 लाखांचा मुद्देमाल घेऊन पलायन केले. काही वेळानंतर त्यांनी स्वतःची सुटका करून घेत ही माहिती आग्रीपाडा पोलिसांना सांगितली.

हेही वाचा – Nagpur Firing : दुचाकीस्वारांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू; भावाच्या हत्येचा घेतला बदला

माहिती मिळताच आग्रीपाडा पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी व्यापार्‍याच्या तक्रारीवरून आग्रीपाडा पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निंबाळकर यांच्या पथकाने उत्तरप्रदेशातून संतोषकुमारला ताब्यात घेतले.

चौकशीत त्यानेच विनोद पालच्या मदतीने हा दरोडा टाकल्याचे कबूल केले. त्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे बहुतांश सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले आहे. या कारवाईनंतर गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर यांच्या पथकाने चोरी करून मध्यप्रदेशात गेलेल्या विनोद पाल याला शिताफीने अटक केली. अटकेनंतर त्याला आग्रीपाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. रॉबरीनंतर अवघ्या काही तासांत दोन्ही आरोपींना अटक करुन पोलिसांनी चोरीचा बहुतांश मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा – New Year : नवीन वर्षात भारतावर दुनियेची नजर


Edited by : Ashwini A. Bhatavdekar