घरमुंबईपुढील महिन्यांत मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या राहणार बंद; एअरपोर्ट प्राधिकरणाने सांगितले कारण

पुढील महिन्यांत मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या राहणार बंद; एअरपोर्ट प्राधिकरणाने सांगितले कारण

Subscribe

एअरपोर्ट प्राधिकरणाने एका निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्यांच्या पावसाळ्यानंतर नियोजित देखभाल दुरुस्तीसाठी 17 ऑक्टोबर रोजी बंद ठेवण्याचा निर्णय विमानतळ प्रशासनाने घेतला आहे. तेव्हा पुढील महिन्यांत 17 ऑक्टोबरच्या प्रवासाचे नियोजन केले असेल ते पुढे ढकलण्याची गरज आहे.(Both runways of Mumbai Airport to remain closed in coming months The reason given by the Airport Authority)

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने शुक्रवारी माहिती दिली की, त्याचे दोन्ही रनवे 17 ऑक्टोबर रोजी तात्पुरत्या स्वरुपात बंद केल्या जाणार आहेत. त्यासाठी सकाळी 11 ते सायंकाळी 5 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. ते तात्पुरते बंद करण्यामागे देखभाल दुरुस्तीचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. पावसामुळे धावपट्टीचे झालेले नुकसान दुरुस्त करण्यात येणार आहे.

- Advertisement -

एअरपोर्ट प्राधिकरणाने एका निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. काळजीपूर्वक नियोजित आणि कार्यान्वित केलेल्या धावपट्टी देखभालीच्या कामांमुळे त्याच्या सुरक्षित, कार्यक्षमाचेही कौतुक केले आहे.

हेही वाचा : राष्ट्रवादीतील वाद शिगेला; अजित पवार गटाने ‘एका’चे नाव वगळून दिले दाखल केली याचिका

- Advertisement -

सहा महिन्याआधीच दिली होती महाती

17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत धावपट्ट्या बंद राहणार आहेत. त्यानंतर कार्यरत होतील, असे निवेदनात म्हटले आहे. धावपट्ट्या तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचा हा विमानतळाच्या वार्षिक प्रतिबंधात्मक देखभाल योजनेचा एक भाग आहे. या संदर्भात हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांना सहा महिने अगोदर नोटीसही बजावण्यात आली आहे.

हेही वाचा : Narendra Modi : पंतप्रधानांनी फॅमिली प्रायव्हेट पार्टी म्हटलेल्या पक्षाने एनडीएसोबत केली युती

500 पेक्षा अधिक विमानसेवांना फटका

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील सर्वांत व्यग्र विमानतळांपैकी एक आहे. येथून दररोज 950 हून अधिक विमानांची ये-जा होते. दोन धावपट्ट्यांपैकी मुख्य धावपट्टीवरून तासाला 46 विमानांची ये-जा होते; तर दुसऱ्या धावपट्टीवर तासाला 35 विमानांची ये-जा होते. विमानांचे आगमन आणि उड्डाणे सुरक्षित व्हावीत म्हणून दरवर्षी पावसाळ्यानंतर धावपट्ट्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते.

जगातील चौथ्या क्रमांकाचे विमानतळ

देशातील दुसरे सर्वाधिक व्यग्र छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देण्याच्या क्रमवारीत जगात चौथ्या स्थानी आहे. विमानतळाने आशिया-पॅसिफिक क्षेत्रात दुसरा क्रमांक पटकावला आहे. याबद्दल आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेकडून (एसीआय) विमानतळाला प्रमाणपत्र मिळाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -