घरमुंबईलोकलमध्ये मुलीसोबत अश्लिल चाळे, तरुण पसार

लोकलमध्ये मुलीसोबत अश्लिल चाळे, तरुण पसार

Subscribe

सीएसटी ते मश्चिद बंदर या स्थानकांदरम्यान घडलेल्या या अनुचित प्रकारामुळे पुन्हा एकदा महिला ट्रेनमध्ये सुरक्षित नसल्याची बाब समोर आली आहे.

शुक्रवारी दुपारी सीएसएमटीहून २ वाजून ४२ मिनिटांनी पनवेलला जाणारी लोकल तिच्या निर्धारित वेळी सुटली. लोकलने वेग पकडल्यानंतर अचानक महिलांच्या डब्यातून एका मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. प्रवाशांनी दचकून आजूबाजूला पाहिलं असता प्रथम वर्गाच्या महिला डब्यात, एक २० वर्षीय तरुण एका मुलीच्या बाजूला बसून तिच्यासोबत अश्लिल चाळे करत असल्याचं प्रवाशांच्या लक्षात आलं. दुपारची वेळ असल्याने गाडीला गर्दी नव्हती. त्यामुळे या तरुणाचं फावलं आणि त्याने महिलांच्या डब्यात चढत पिडीतेसोबत अश्लिल चाळे केले. तो अश्लिल चाळे करत असताना काही प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ देखील काढला. दरम्यान ज्यावेळी लोकल ट्रेनने मस्जिद बंदर स्थानकात प्रवेश केला, त्यावेळी त्या तरुणाने प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर चालत्या गाडीतून उडी मारली आणि पसार झाला. गाडीतून उडी मारल्यानंतर तो तरुण वेगाने बाजूचे २ ट्रॅक ओलांडले आणि प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ च्या गर्दीत जाऊन मिसळला, अशी माहिती उपस्थितांनी दिली.

पोलिसांची उशिराने मदत

या सर्व प्रकारामुळे पीडित मुलगी सध्या मानसिक तणावाखाली गेली आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर तात्काळ काही प्रवाशांनी याची सर्व माहिची रेल्वे पोलिसांच्या १५१२ क्रमांकावर दिली आणि त्या मुलीला आधाराची गरज असल्याने लवकरात लवकर मदत पाठवण्याची विनंतीही केली. मात्र, तोपर्यंत गाडी वडाळा स्थानकात पोहोचली होती. पीडित मुलीने वडाळा स्थानकात उतरुन तक्रार नोंदवावी असा सल्लाही काही प्रवाशांनी दिला. मात्र, मुलगी प्रचंड घाबरलेली असल्याने तिने तक्रार दिली नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांना कळवण्यात आला. त्यामुळे आता पोलिसांनी या मुलाला शोधून योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -