घरमुंबईभांडूपमध्ये दिवसाढवळ्या तरुणाची निर्घृण हत्या

भांडूपमध्ये दिवसाढवळ्या तरुणाची निर्घृण हत्या

Subscribe

भांडूपमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणाची दोन जणांनी निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. कॉलेज समोरच तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन तरुणानी सुशीलकुमार या तरुणावर वार केले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

मुंबईमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. भांडुपमध्ये कॉलेजच्यासमोरच एका विद्यार्थ्यांची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. सुशील वर्मा या १७ वर्षीय तरुणाची अज्ञातांनी निर्घृण हत्या केली आहे. श्रीमती राम कली सन्मान सिंग कॉलेजसमोरच दिवसाढवळ्या हा सर्व प्रकार घडल्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

धारधार शस्त्राने वार करुन हत्या

भांडुपच्या रामकली कॉलेजमध्ये सुशीलकुमार १२ वी सायन्सचा विद्यार्थी होता. आज सकाळी सुशीलकुमारला दोन जणांनी फोन करुन कॉलेजच्या बाहेर बोलावले. सुशीलकुमार कॉलेजच्या बाहेर आले असता तोंडाला रुमाल बांधून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर धारधार शस्त्राने वार केले. या हल्ल्यामध्ये सुशीलकुमारचा जागीच मृत्यू झाला. आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुशीलकुमारचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलला पाठवला.

- Advertisement -

एकतर्फी प्रेमातून हत्या

या हत्येप्रकरणी पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता प्रेम प्रकरणातून सुशीलकुमारची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. सुशीलकुमार त्याच्या कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मुलीवर प्रेम करत होता. आरोपीला सुशीलकुमारच्या प्रेयसिवर एकतर्फी प्रेम करत होता. ही तरुणीला त्याला प्रेमाला नकार देत होती. त्यामुळे आरोपीने सुशीलच्या हत्या करण्याची योजना बनवली. सुशीलकुमारला कॉलेजबाहेर बोलवून त्याची हत्या केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -