नवीन मोबाइल देण्यास आईचा नकार, मुलाने शेतातच आवळला साडीने गळा

फातिमा मेरी भाजी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्या दिवशीही ती नेहमीप्रमाणे भाजी विकण्यासाठी शेतात गेली होती. जेस मेरीने भाऊ दीपकला आईला शेतातून परत आणण्यास सांगितले होते.

नवीन मोबाईल (new mobile) फोन घेऊन न दिल्याने आईची (mother) हत्या (murder) केल्याची खळबळजनक घटना शनिवारी कर्नाटकमध्ये (karnatak) घडली आहे. पोलिसांनी (police) याप्रकरणी एका २६ वर्षीय तरुणाला अटक केली. दीपक असे त्याचे नाव असून तो मैलासांद्रा येथील लुकास लेआउटचा रहिवासी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपकने 1 जून रोजी त्याची आई फातिमा मेरी (50) यांचा गळा आवळून खून केला. आरोपीची बहीण जैस मेरीने तिची आई बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. फातिमा मेरी भाजी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्या दिवशीही ती नेहमीप्रमाणे भाजी विकण्यासाठी शेतात गेली होती. जेस मेरीने भाऊ दीपकला आईला शेतातून परत आणण्यास सांगितले होते. काही वेळाने दीपकने वडील आरोग्यस्वामी यांना फोन करून आई रस्त्याच्या कडेला पडल्याचे सांगितले. मात्र, दीपकने चौकशीदरम्यान आईची हत्या केल्याचे कबूल केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपकने चौकशीदरम्यान सांगितले की, आईला भेटल्यानंतर त्याने तिच्यासाठी मोबाईल फोन खरेदी करण्याची मागणी केली होती. पण आईकडे पैसे नव्हते. त्यामुळे मोबाईल घेण्यासाठी पैसे नाहीत, असे सांगून त्याने रागाच्या भरात आईचा साडीने गळा आवळून खून केला. आईची हत्या केल्यानंतर दीपकने तिच्याकडील ७०० रुपये घेऊन पळ काढला. या प्रकरणाची पोलिसात नोंद करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी फरार दीपकचा शोध सुरू केला. अखेर शनिवारी पोलिसांनी दीपकला अटक केली. दीपकची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून मोबाईल घेण्यासाठी पैसे न दिल्याने आईचा गळा दाबून खून केल्याचे सांगितले.