घरताज्या घडामोडीइन्स्टाग्रामवर चेक इन करत सेल्फी अपलोड करणाऱ्या तरुणाचे लैंगिक शोषण

इन्स्टाग्रामवर चेक इन करत सेल्फी अपलोड करणाऱ्या तरुणाचे लैंगिक शोषण

Subscribe

वासनांध नराधमांचा उच्छाद वाढला, तरुणींसोबत आता तरुणही पडतायत लैंगिक अत्याचाराचे बळी...

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे भारताची मान शरमेने खाली जात आहे. लहान मुलींपासून ते वृद्धांपर्यंत महिला सुरक्षित नाहीत, ही भावना आता मूळ धरत आहे. अशाताच मुंबईत घडलेल्या एका घटनेमुळे मुलीच नाही तर मुलंही सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. कुर्ल्यातील एका २२ वर्षीय तरुणाला लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागले आहे. इन्स्टाग्रावर अपलोड केलेला सेल्फी पाहून चार आरोपींनी या तरुणाचे लैंगिक शोषण केले. चार पैकी एक आरोपी हा अल्पवयीन आहे, हे विशेष. सध्या तीन आरोपी पोलिस कोठडीत आहेत, तर अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे.

पीडित तरुण कुर्ला येथील एका रेस्टॉरंटमध्ये ८ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजता गेला होता. तिथला सेल्फी काढून त्याने इन्स्टाग्रामवर हॉटेलच्या लोकेशनसहीत पोस्ट केला. सेल्फी अपलोड केल्याच्या १५ मिनिटांनी दोन आरोपी पीडित तरुणाला त्याच हॉटेलमध्ये गाठलं. आम्ही तुझा सेल्फी लाईक केलाय अशी बतावणी करत पीडित तरुणासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघांनी त्याला मोटारसायकलवरुन भटकंती करण्याची ऑफर दिली. पीडित तरुणाने ही ऑफर स्वीकारली. २० मिनिटांनी ते मुबंई विमानतळाच्या जवळ पोहोचले. तिथे आधीपासूनच एक आरोपी कारमध्ये त्यांची वाट पाहत होता. त्यानंतर तीनही आरोपींना त्याला जबरदस्ती गाडीत कोंबले.

- Advertisement -

हे वाचा – निर्भयाच्या बलात्काऱ्यांची कोर्टात संतापजनक मागणी!

रात्री ११.३० वाजता अल्पवयीन आरोपी देखील त्याठिकाणी पोहोचला. लैंगिक शोषणासाठी तयार होईपर्यंत तब्बल एक तास ते चौघे पीडित तरुणाला मारत होते. पीडित तरुणावर लैंगिक अत्याचार केल्यानतंर रात्री १.३० वाजता आरोपींनी त्याला कुर्ला येथे रस्त्यावर सोडून पळ काढला. त्यानंतर तरुणाने आपल्या कुटुंबाला झालेली कैफीयत सांगत थेट पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी पीडित तरुणाची तक्रार लिहून घेतल्यानंतर त्याला सायन रुग्णालयात पाठवले. सायन रुग्णालयातील न्यायवैद्यक विभागाचे डॉ. राजेश दरे यांनी सांगितले की, आम्ही पीडित तरुणाची तपासणी करुन योग्य ते पुरावे गोळा केले आहेत. त्याचा अहवाल येण्यासाठी काही आठवडे लागू शकतात.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. चारही आरोपी हे सधन कुटुंबातील आहेत. तीन सज्ञान आरोपींना सोमवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. तर अल्पवीयन आरोपीला बालसुधारगृहात रवाना केले आहे. चौघेही आरोपी घाटकोपर येथे राहणारे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -