घरCORONA UPDATEप्रेयसीच्या पतीची हत्या करुन अपघाताचा बनाव; प्रियकरासह चौघांना अटक

प्रेयसीच्या पतीची हत्या करुन अपघाताचा बनाव; प्रियकरासह चौघांना अटक

Subscribe

प्रेयसीच्या पतीची हत्या केल्याप्रकरणी प्रियकरासह चौघांना कुठलाही पुरावा नसताना शिवाजीनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. नौशाद मकसूद खान, रामकुमार ऊर्फ देवराज पंनाला निर्मल, नूर आलम मुनीर खान आणि मोहम्मद तकी अहमद शेख अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात यास्मिन खान ही महिला तिचा पती आहादउल्ला खानसोबत राहते. १८ जूनला तिने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिच्या पतीची मिसिंगची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी मिसिंगची तक्रार करुन त्याचा शोध सुरु केला होता. याच दरम्यान पोलिसांना यास्मिनचे नौशाद खान या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे समजले होते. आहादउल्लाने नौशादकडून काही उसने पैसे घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने ते पैसे परत केले नव्हते. त्यामुळे नौशादने आहादउल्लाला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर आहादउल्लाचा भाऊ साजिद खान याने नौशादविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार करुन त्याने त्याचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला होता. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविला. या गुन्ह्यांचा सहाय्यक पोलीस आयुक्त विश्वपाल भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरक्षक किशोर गायके यांनी गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले होते.

- Advertisement -

या आदेशानंतर या पथकाने वेगवेगळ्या परिसरातून नौशाद खानसह इतर तिघांना अटक केली. या चौघांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनीच १७ जूनला आहादउल्लाचे अपहरण करुन त्याची तुर्भे येथील एमआयडीसी परिसरात डोक्यात लोखंडी हातोड्याने मारहाण करुन हत्या केली. हत्येनंतर त्यांनी त्यांच्या डोक्यावरुन कार चालवून अपघात असल्याचा बनाव केला होता. याप्रकरणी तुर्भे पोलिसांनीही अपघाताची नोंद करुन केस बंद केली होती.

मात्र चौकशीत ही हत्या असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या चौघांविरुद्ध पोलिसांनी अपहरण, हत्या, हत्येचा पुरावा नष्ट करणे आणि पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता, याच गुन्ह्यांत नंतर नौशादसह इतर तिघांनाही पोलिसांनी अटक केली. नौशादचे यास्मिनसोबत अनैतिक संबंध होते. या संबंधाला आलाहाउल्लाचा विरोध होता, त्यात उसने घेतलेले पैसे तो परत करत नव्हता, त्यातून त्याने रागाच्या भरात त्याची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याकामी त्याने इतर तिघांची मदत घेतली होती. मात्र कुठलाही पुरावा नसताना विश्वपाल भुजबळ, किशोर गायके यांच्या पथकाने या हत्येचा पर्दाफाश केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -