घरक्राइमबलात्कार पीडितेच्या न्यायासाठी प्रियकरानं मंत्रालयाच्या 5व्या मजल्यावरून मारली उडी

बलात्कार पीडितेच्या न्यायासाठी प्रियकरानं मंत्रालयाच्या 5व्या मजल्यावरून मारली उडी

Subscribe

प्रियकराने आज मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. बापू नारायण मोकाशी असे या प्रियकराचे नाव असून, तो त्याचे वय ४३ वर्षांचा आहे

मुंबईः आत्महत्या केलेल्या बलात्कार पीडित प्रेयसीच्या न्यायासाठी चक्क तिच्या प्रियकरावरच मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. बलात्कार पीडित आपल्या प्रेयसीला न्याय मिळावा, यासाठी प्रियकर मागील तीन वर्षांपासून मंत्रालय आणि पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवत आहे. परंतु शासनाने त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेय. अखेर त्या प्रियकराने मंत्रालयातच टोकाचे पाऊल उचललेय.

प्रियकराने आज मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. बापू नारायण मोकाशी असे या प्रियकराचे नाव असून, तो ४३ वर्षांचा आहे. हा प्रियकर बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी गावातील रहिवासी आहे. प्रियकर बापू मोकाशी याने पाचव्या मजल्यावरून उडी मारली, पण मंत्रालयात जाळी लावण्यात आली असल्याने तो प्रियकर जाळीवर पडला, त्यामुळे त्याला फार दुखापत झाली नाही, अशी माहिती मिळाली आहे. पोलिसांनी त्या प्रियकराला ताब्यात घेतले असून, वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवलेय.

- Advertisement -

आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती, त्यामुळे मंत्रालयात वर्दळ होती. अशातच अचानक बापू मोकाशी याने त्यांच्या मागण्यांवर शासनाकडून दखल घेतली जात नसल्यानं थेट आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय. या घटनेनंतर मंत्रालयात खळबळ उडाली आहे. जिथे सुरक्षा जाळी होती, त्या ठिकाणी पोलिसांनी तातडीने धाव घेतली. पोलिसांनी बापू मोकाशीची समजूत काढून सुरक्षा जाळीतून त्याला बाहेर काढले आणि त्यानंतर बराच वेळ पोलिसांनी बापू मोकाशीची चौकशी करून त्याला ताब्यात घेतले. मागील काही दिवसांपासून ही दुसरी घटना घडली असल्याने प्रशासनाची मात्र डोकेदुखी वाढली आहे. आज झालेल्या घटनेमुळे मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

विधिमंडळ अधिवेशनाच्या काळातही आत्महत्येचा प्रयत्न
ऑगस्ट महिन्यात झालेल्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आधीही मंत्रालयाच्या गच्चीवर चढून एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला सुखरूप खाली उतरवले.

- Advertisement -

हेही वाचाः पश्चिम बंगालमधील एका कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरींची तब्येत बिघडली

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -