घरमुंबईबीपीसीएल स्फोट: वेळीच उडी मारली म्हणून तो वाचला

बीपीसीएल स्फोट: वेळीच उडी मारली म्हणून तो वाचला

Subscribe

चेंबूरच्या बीपीसीएल कंपनीत आज भयानक असा स्फोट झाला. कर्मचाऱ्यांची पळापळ सुरु होती. ४२ वर्षीय अवधूत परबही आपला जीव मुठीत घेऊन पळाले. त्यांनी वेळीच बाहेर उडी टाकली म्हणून ते वाचले.

“जवळपास १५ वर्षांपासून बीपीसीएल कंपनीत इलेक्ट्रॉनिक विभागात तो काम करतोय. आज जर त्याने ब्लास्ट झाल्यावर पळापळ करून बाहेर उडी मारली नसती आणि तो रस्त्यावर आला नसता तर काही खरं नव्हतं”, अशी प्रतिक्रिया चेंबूरच्या बीपीसीएल कंपनीत झालेल्या ब्लास्टमध्ये जखमी झालेले ४२ वर्षीय अवधूत परब यांचे भाऊ भाई परब यांनी माय महानगरशी बोलताना दिली.

मंगळवारी चेंबूरच्या बीपीसीएल म्हणजेच भारत पेट्रलियम कंपनी लिमिटेड या कंपनीत दुपारी २.४८ च्या दरम्यान मोठा आवाज झाला. आवाज झाल्यानंतर कंपनीत ब्लास्ट झाल्याचं समजलं. रिफायनरी असल्याकारणाने ब्लास्ट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आग लागली. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. धावपळीत अनेक जण जखमी झाले. त्यात अवधूत परब देखील होते. त्यांनी आवाज झाल्याबरोबर कंपनीतून बाहेर येण्यासाठी धावपळ केली आणि त्यात ते जखमी झाले. त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली असून फ्रॅक्चर झालं आहे.

- Advertisement -

माहुलच्या बीपीसीएल प्लांटमध्ये ब्लास्ट, भीषण आगीत अडकले कर्मचारी

 

त्याने उडी मारली म्हणुन तो‌ वाचला. तो प्लांटच्या जवळच होता. सर्व पत्रे, काचा वगैरे उडायला लागल्या. त्यामुळे एकच धावपळ उडाली. त्यात त्याने उडी देखील मारली. त्याच्या उजव्या पायाला लागलं आहे. मात्र आता रुग्णालयातून डिस्चार्ज घ्यायचा विचार करत आहोत. – भाई परब (अवधुत परब यांचा मोठा भाऊ)

 

- Advertisement -

आम्ही वेळीच बाहेर पडलो म्हणून वाचलो…

सौद शेख (४५) या रिफायनरीमध्ये काम करत होते. माहुल गावात ते भाड्याने राहतात. २० वर्षापासून शेख चेंबूर येथील भारत पेट्रोलियम रिफायनरीमध्ये कार्यरत आहेत. या रिफायनरी प्रकल्पात ते मेकॅनिकल विभागात काम करतात.
बुधवारी सकाळी शेख नेहमीप्रमाणे कामाला गेले असताना अचानक दुपारी स्फोट झाला. स्फोटात ते गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाचा मोठा आवाज झाल्यावर शेख आणि त्यांचे सहकारी स्वतः चा जीव वाचवण्यासाठी बाहेरच्या दिशेने धावत सुटले. मात्र नेमकं त्याचं वेळी हायड्रोजन टँकचा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की प्लान्टच्या आजूबाजूला लावलेले पत्रे उडाले. त्यातील एक पत्रा धावताना शेख यांच्या तोंडावर जोरात आदळला. या अपघातात त्यांच्या ओठाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे चेंबूर येथील शुश्रृत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ओठ फाटल्याने मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झालाय. त्यामुळे त्यांना टाके घालण्यात आले आहेत.

saut shaikh victim of BPCL blast
सौद शेख (फोटो – टाइम्स ऑफ इंडिया वेबसाईट)
Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -