घरमुंबईलॉ शाखेचे निकाल 10 दिवसांत लावणार

लॉ शाखेचे निकाल 10 दिवसांत लावणार

Subscribe

परीक्षा विभाग विकणे आहे, असा नारा देत महाराष्ट्र स्टुडंट्स लॉ असोसिएशनच्या (मसला) वतीने बुधवारी दुपारी मुंबई विद्यापीठाच्या कारभाराविरोधात जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल घेत मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे संचालक विनोद पाटील यांनी 10 दिवसात परीक्षेचा निकाल लावण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आले.

एलएलबी, एलएलएमचे निकाल तात्काळ जाहीर करावे, मुख्य निकाल जाहीर केल्यानंतर १० दिवसात पुनर्मुल्यांकनाचे निकाल जाहीर करावे, सर्वच सेमिस्टरच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ऑफलाईन करून विद्यापीठ स्तरावर करावे, विद्यार्थ्यांना तात्काळ बॅचलर ऑफ जनरल डिग्रीचे प्रमाणपत्र द्यावे, एलएलएमच्या विद्यार्थ्यांना मराठीत प्रश्नपत्रिका उपलब्ध कराव्यात, तसेच लॉ शाखेचा निकाल तातडीने लावावा आदी मागण्यांसाठी मसलाच्या वतीने बुधवारी कलिना कॅम्पसमधील परीक्षा भवनसमोर सकाळी साडेबारा वाजता ‘परीक्षा भवन विकणे आहे’ असा नारा देत जोरदार आंदोलन केले.

- Advertisement -

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर यांनी आंदोलनकर्त्यांना दूरध्वनी करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावर जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. त्यामुळे परीक्षा संचालक विनोद पाटील, उपकुलसचिव विनोद माळाळे, कृष्णा पराड यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मागण्या मान्य करण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद देत त्यांना लेखी आश्वासन दिले. तसेच लॉ शाखेचा निकाल 10 दिवसांत लावण्यात येईल, असे आश्वासनही दिल्याचे मसलाचे अध्यक्ष सिद्धार्थ इंगळे यांनी सांगितले. परंतु 10 दिवसांत निकाल न लावल्यास आम्ही अधिक तीव्र आंदोलन करू, असा इशाराही इंगळे यांनी दिला. आंदोलनाला ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशननेही पाठिंबा दर्शवला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -