घरताज्या घडामोडीऑफलाईनद्वारे पालिकेच्या विद्यार्थ्यांनाही आणले शिक्षणाच्या प्रवाहात

ऑफलाईनद्वारे पालिकेच्या विद्यार्थ्यांनाही आणले शिक्षणाच्या प्रवाहात

Subscribe

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने खासगी शाळांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करत मुलांना शिक्षण देण्यात सुरुवात केली. मात्र मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्वच मुलांना या ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेता येत असल्याने महापालिकेने आता ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी मुलांना व्यवसाय पत्रिकांची छपाई करत वाटप करण्यात आले आहे. जेणेकरून या व्यवसाय पत्रिकांमधील अभ्यास करून मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले जात आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील ज्या मुलांना ऑनलाईन शिक्षण पध्दतीत सहभागी होता येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब केला जात आहे. ऑफलाईनसाठी महापालिका शिक्षण विभागाने व्यावसाय पत्रिका तयार केल्या आहेत. या पत्रिका शाळांना पाठवण्यात आल्या आहेत. यासाठी पत्रिकांच्या झेरॉक्स काढून त्या मुलांना देण्यासाठी डिसेंबर महिन्यापर्यंतचे पैसे मंजूरही करून घेण्यात आले आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश देत मुख्यध्यापकांनी काढलेल्या झेरॉक्सचे पैसे देण्याच्याही सूचना केल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक महिन्याला मुख्याध्यापक व्यावसायिक पत्रिकांची छपाई करून त्या वर्कशिट पालकांना शाळेत बोलावून देत आहे.

- Advertisement -

शिक्षण विभागाने राबवली बालक, पालक व शिक्षक मित्रची संकल्पना

वर्ल्ड बँकेच्या म्हणण्यानुसार, चार महिने जर शाळा बंद राहिली तर मुलं दोन वर्षे शिक्षणापासून मागे जाईल. त्यामुळे ज्या मुलांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही. त्यांच्यासाठी ऑफलाईन शिक्षण देतानाच महापालिकेच्या शिक्षण विभागाने बालक,पालक व शिक्षक मित्र अशा संकल्पना प्रत्यक्षात राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या संकल्पनेची अंमलबजावणी करत सर्वच मुलांना शिक्षणाचा प्रवाहात पुन्हा आणले जात आहे.

महापालिका शाळांमधील मुलांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येत असले तरी आतापर्यंत सुमारे ३० टक्केच मुलांपर्यंत पुस्तके पोहोचली आहेत. या पुस्तकांसोबतच व्यावसाय पत्रिकाही पालकांना दिल्या जात आहे. त्यामुळे ज्या मुलांना आतापर्यंत या पुस्तकांचे व व्यावसाय पत्रिका मिळाल्या नाहीत, त्यांना आता खासगी स्वयंसेवी संस्था तसेच बालक, पालक मित्रांद्वारे ते मुलांपर्यंत पोहोचण्याचे काम केले जात असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

- Advertisement -

काय आहे बालक, पालक व शिक्षक संकल्पाना

बालक मित्र :

जे मुलं स्वत:हून शिकू शकत नाही. आणि त्याच्याकडे स्मार्ट फोनही. पण शेजारच्या मुलाकडे जर स्मार्ट फोन असेल तर त्यांनी आपला फोन त्या मुलासोबत शेअर करून एकत्र अभ्यास करणे. किंवा एखादा लहान मुलगा दुसरी ते तिसरीत आहे. पण त्यांच्या आई-वडिलांकडे स्मार्टफोन आहे पण शाळेतून काय अभ्यास दिला आहे कळतच नाही. अशा परिस्थितीत मग शेजारच्या मोठया विद्यार्थ्याने त्यांना मदत करून अभ्यासाची माहिती द्यायची, याला बालक मित्र असे म्हणतात.

पालक मित्र :

जर शाळेत व्यवसाय पत्रिका आणायची आहे आणि एखाद्या मुलाचे पालक सकाळी कामाला निघून जात असतील आणि रात्री येत असतील. त्यामुळे ते पालक जावू शकत नाही. अशा परिस्थितीत शेजारचे पालक त्या मुलाच्या व्यावसाय पत्रिका शाळेतून घेऊन जातील आणि शाळेशी समन्वय राखून पुन्हा सोडवलेल्या पत्रिका परत शिक्षकांकडे जमा करतील. किंवा एखादा पालक आपल्या मुलाबरोबरच शेजारच्याही मुलाला शिकवत असेल तर त्याला पालक मित्र संबोधले जाते.

शिक्षक मित्र :

जे शिक्षक प्रत्यक्ष वस्तीत जाऊन मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना मार्गदर्शन करतात त्यांना शिक्षक मित्र असे संबोधले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -