घरताज्या घडामोडीबिल्डरांची टेंडरकडे पाठ; प्रकल्प बाधित आजही पर्यायी घरांच्या प्रतिक्षेतच

बिल्डरांची टेंडरकडे पाठ; प्रकल्प बाधित आजही पर्यायी घरांच्या प्रतिक्षेतच

Subscribe

मुंबई महापालिकेला विविध प्रकल्पांच्या कामांच्या (नाला, नदी, रस्ता रुंदीकरण इत्यादी) अंतर्गत बाधित होणाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी सध्या तरी ३५ हजार पर्यायी घरांची (सदनिका) आवश्यकता आहे. मात्र या घरांच्या उभारणीसाठी तीन वेळा टेंडर काढूनही बिल्डर त्यास अपेक्षित प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे पालिकेला आता नव्याने पर्यायी घरे उभारण्यासाठी टेंडर काढण्याची नामुष्की ओढवली आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेला विविध प्रकल्पांच्या कामांच्या (नाला, नदी, रस्ता रुंदीकरण इत्यादी) अंतर्गत बाधित होणाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी सध्या तरी ३५ हजार पर्यायी घरांची (सदनिका) आवश्यकता आहे. मात्र या घरांच्या उभारणीसाठी तीन वेळा टेंडर काढूनही बिल्डर त्यास अपेक्षित प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे पालिकेला आता नव्याने पर्यायी घरे उभारण्यासाठी टेंडर काढण्याची नामुष्की ओढवली आहे. तर टेंडर काढल्यावर त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळून प्रत्यक्षात घरांची उभारणी होईपर्यंत प्रकल्प बाधितांना प्रतिक्षाच करावी लागणार आहे.

मुंबई महापालिकेकडून शहर व उपनगरात विविध ठिकाणी नदी, नाला, रस्ता रुंदीकरण, नवीन पूल उभारणी आदी कामांसाठी अनेक झोपडीधारक, दुकान, गोदाम मालक आदिना बाधित झाल्याने मूळ जागेवरून हटवावे लागते. मात्र त्या बाधितांना हटविताना त्यांना पालिकेकडून पर्यायी घरे देणे बंधनकारक असते. पालिकेकडे बाधितांना देण्यासाठी पर्यायी घरे उपलब्ध नाहीत. सध्या पालिकेला बाधितांना देण्यासाठी ३५ हजार पर्यायी घरांची आवश्यकता आहे. त्यामुळे सध्या प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन माहुल येथे करण्यात येते. मात्र माहुल येथे सुविधांचा अभाव असल्याने बाधित त्या ठिकाणी राहायला जायला नकार देतात. त्यांना राहत्या ठिकाणीच अथवा आजूबाजूला पर्यायी घरे हवी असतात. त्यामुळेच पालिकेने आता शहर व उपनगरात सहा झोनमध्ये ३५ हजार पर्यायी घरे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र टीडीआर कमी मिळत असल्याने पालिकेच्या टेंडरकडे बिल्डर पाठ फिरवत आहेत. बिल्डरांना अपेक्षित नफा अथवा लाभ मिळत नसल्यानेच ते पालिकेच्या टेंडरला अपेक्षित प्रतिसाद देत नाहीत.

- Advertisement -

प्रत्येक झोनमध्ये किमान पाच हजार पर्यायी घरे बांधण्याचा पालिकेचा उद्देश आहे. यासाठी तीन वेळा निविदा काढण्यात आल्या आहेत. मात्र तिन्ही निविदा प्रक्रियेत एक दोन झोनमध्ये बिल्डरांचा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असता ही एक दोन झोन मध्येच बिल्डर पुढे आले. सध्या शहर व उपनगरात मिळून ३०० चौरस फुटांची एकूण १३,८७१ हजार घरे बांधण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या सुधार समितीचे सह आयुक्त रमेश पवार यांनी दिली.

पालिकेच्या टेंडरला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे प्रकल्पबाधितांना घरांच्या बदल्यात रेडीरेकनरनुसार रोख पैसे देण्याचाही पालिकेने पर्याय ठेवला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – एअर इंडिया पुन्हा वादात; महिला प्रवाशाला विमानातील खाद्यपदार्थात सापडले बारीक दगड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -