Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भिवंडीत एक मजली इमारत कोसळली

भिवंडीत एक मजली इमारत कोसळली

एकाचा मृत्यू तर सात जण जखमी

Related Story

- Advertisement -

भिवंडी शहरातील आजमी नगर , टिपू सुलतान चौक परिसरात असलेली एक मजली इमारत कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले आहेत.

शहरातील आजमी नगर, टिपू सुलतान चौक परिसरात शब्बीर अंसारी यांचे राहते घर होते. मार्केट परिसरात असलेल्या या घराच्या आजूबाजूला शब्बीर यांनी घराच्या गॅलेरीवर वाढीव अधिकृत बांधकाम केले होते. या इमारतीच्या खाली किराणा दुकान तसेच इतर दुकाने होती. मार्केट परिसर व दुकाने असल्याने या ठिकाणी नागरिक खरेदीसाठी आले होते. त्यावेळी वाढीव गॅलेरी व घराचा भाग खरेदीसाठी आलेल्या नागरिकांवर कोसळल्याने या दुर्घटनेत एक जण मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत.

- Advertisement -

विशेष म्हणजे या दुर्घटनेत घरातील कोणीही जखमी झाले नसून मार्केट व दुकानात खरेदीसाठी आलेले नागरिक आणि महिला दुर्घटनेत सापडल्या. जखमींना शहरातील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये तिघांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल , पोलीस व आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक दाखल होत मदतकार्य सुरू होते. भोईवाडा पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद करण्यात आली आहे.

रजाक (वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे) असे दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर हसीम शेख ३५, सुबेदा खातून ३५ , अमिना अन्सारी ४५ , रोशन बानो ३०, जारा कलाम १२, रोजी फातिमा १४, जिकरा अन्सारी १४ अशी जखमींची नावे आहेत.

- Advertisement -