घरभक्तीगजनान महाराज भक्तांसाठी आनंदाची बातमी, 'या' तीन गाड्यांना शेगाव थांबा

गजनान महाराज भक्तांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ तीन गाड्यांना शेगाव थांबा

Subscribe

शेगाव येथे संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी जाणा-या भाविकांची सोय व्हावी, यासाठी आता अकोला स्थानकावरुन नागपूर- पुणे एक्स्प्रेससह तीन एक्स्प्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्वावर सहा महिने थांबा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील शेगाव हे तिर्थक्षेत्रांपैकी एक गणले जाते. परंपरेनुसार, श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये श्री राम जन्मोत्सवालादेखील सुरुवात झाली आहे. भाविक गण गण गणात बोतेच्या गजरात तल्लीन होऊन गेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी जाणा-या भाविकांची गैरसोय होऊ नये, म्हणून मध्य रेल्वेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

आता संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी जाणा-या भाविकांना रेल्वेने खुशखबर दिली आहे. शेगाव येथे संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी जाणा-या भाविकांची सोय व्हावी, यासाठी आता अकोला स्थानकावरुन नागपूर- पुणे एक्स्प्रेससह तीन एक्स्प्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्वावर सहा महिने थांबा देण्यात आला आहे. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता, सरकारने हा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार, हा थांबा कायमस्वरुपी करण्याची शक्यता आहे. ही ट्रेन येत्या 31 मार्चपासून पुढील सहा महिने शेगाव स्थानकावर थांबणार आहे.

- Advertisement -

यामध्ये नागपूर-पुणे-नागपूर एक्स्प्रेस ही ट्रेन येत्या 31 मार्चपासून शेगाव स्थानकावर थांबणार आहे. तर दुसरी ट्रेन अमृतसह- नांदेड एक्स्प्रेसला 28 मार्चपासून तर 12421 नांदेड- अमृतसर एक्स्प्रेसला 29 मार्चपासून शेगाव स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 12752 जम्मुतावी- नांदेड हमसफर एक्स्प्रेस 27 मार्चपासून, गाडी क्रमांक 12751 नांदेड जम्मुतावी हमसफर ही गाडी 31 मार्चपासून शेगाव या स्थानकावर थांबणार आहे.

( हेही वाचा: 2023 मध्ये देखील अनेकांवर मृत्यूचं सावट? काय आहे बाबा वेंगाची यंदाची भविष्यवाणी )

- Advertisement -

शेगावला जात असाल तर ‘या’ ठिकाणांना भेट द्या

  • मोटेंचं शिव मंदिर – हे शंकर आणि विष्णू मंदिर आहे. याचा जिर्णोद्धार संस्थानाने केला आहे. त्यामुळे आता हे मंदिर सुंदर स्थापत्याने परिपूर्ण आहे.
  • महाराजांचे प्रगट स्थळ-बहुतेक जण शेगावला येऊन समाधी मंदिरातील दर्शन घेतात. पण पहिल्या अध्यायात गजानन महाराजांचे सर्व प्रथम दर्शन, भेट बंकटलाल होते त्याबद्दल बहुतेक लोक त्याजागी जात नाहीत वा ती जागा अजूनही गावात आहे, याबद्दल अनभिज्ञ असतात.
  • बंकटलालचा वाडा- प्रकट स्थळापासून मूळ रस्त्यावर वाड्याच्या जागी एक सभागृह बांधले आहे. आत महाराजांचा फोटो, पादुका आणि बंकटलालच्या वडिलांची हातात तराजू घातलेली प्रतिकृती आहे.
  • जुने शिवमंदिर- प्रमुख मंदिराजवळील महाप्रसाद गृहाकडे जाताना एक जुने शिव मंदिर आहे. हेमाडपंथी नसलेले पण मोठ्या खांबाचे पुरातन आणि वेगळा फील देणारे हे मंदिर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -