घरदेश-विदेशरेमंड्सचे मालक गौतम सिंघानियांना त्यांच्या पत्नीने मागितले घटस्फोटासाठी 'एवढे' पैसे; रक्कम पाहून...

रेमंड्सचे मालक गौतम सिंघानियांना त्यांच्या पत्नीने मागितले घटस्फोटासाठी ‘एवढे’ पैसे; रक्कम पाहून…

Subscribe

मुंबई : कौटुंबीक वाद केवळ सर्वसामान्यांच्याच घरात असतात असे नाही तर हे वाद कोट्यधीश लोकांच्याही घरात असतात. असाच एक कौटुंबीक वाद समोर आला असून, याच कौटुंबीक वादातून उद्योगपती गौतम सिंघानिया यांना त्यांच्या पत्नीने घटस्फोटासाठी पोटगी स्वरुपात कोट्यवधीची रक्कम मागितली असून, त्या रक्कमेचा आकडा तुम्ही डोळे विस्फारूनच पहाल असाच आहे. (Businessman Gautam Singhanias Wife Demands So Much For Divorce By looking at the amount…)

देशातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांपैकी एक आणि रेमंड ग्रुपचे प्रमुख गौतम सिंघानिया सध्या चर्चेत आहेत. नुकतेच त्यांनी पत्नी नवाज मोदी सिंघानियापासून घटस्फोटाची घोषणा सोशल मीडियावर पोस्ट करत केली होती. आता या घटस्फोटाच्या प्रकरणावर तोडगा काढण्यासंदर्भात नवाज मोदींनी केलेल्या मागणीची माहिती समोर आली आहे. समोर आलेली माहिती अधिकृत ठरवली तर गौतम सिंघानिया आणि नवाज मोदी सिंघानिया यांच्यातील होणारा घटस्फोट हा देशातील सर्वात मोठा घटस्फोट ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisement -

द इकोनॉमिक्स टाइम्सच्या एका वृत्तानुसार, उद्योगपती गौतम सिंघानिया यांच्या पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांनी कौटुंबीक सेटलमेंटचा भाग म्हणून गौतम सिंघानिया यांच्याकडे त्यांच्या एकूण संपत्तीपैकी तब्बल 75 टक्के रक्कम पोटगी स्वरुपात मागितली आहे. नवाज मोदींनी स्वतःसाठी आणि त्यांच्या दोन मुली निहारिका आणि निसा यांच्यासाठी ही मागणी केल्याचे सांगण्यात आले आहे. गौतम सिंघानिया यांनीही या मागणीला सहमती दर्शविल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांकडून पुढे येत आहे.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीस थेटच बोलले; संजय राऊतांची विकृत मानसिकता दिसून आली

- Advertisement -

सिंघानियांकडे एवढे आहे संपत्ती

गौतम सिंघानिया हे भारतातील सर्वात जुने उद्योगपती कुटुंबापैकी एका कुटुंबातील सदस्य आहेत. सध्या ते रेमंड्स ग्रुपचे एमडी आणि चेअरमन आहेत. मुकेश अंबानी यांच्यानंतर मुंबईत त्यांचे दुसरे सर्वात महागडे आणि आलिशान घर आहे. गौतम सिंघानिया हे त्यांच्या लग्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात. त्यांची एकूण संपत्ती 1.4 अब्ज डॉलर (सुमारे 11 हजार कोटी रुपये) असल्याचे सांगितले जाते. यानुसार नवाज मोदींची मागणी 8,250 कोटींची आहे. म्हणजेच हे घटस्फोट प्रकरण 8 हजार कोटींपर्यंत जाणार आहे.

हेही वाचा : ‘माझ्याकडे आणखी 27 फोटो- 5 व्हिडीओ’; संजय राऊतांचा बावनकुळेंवर पुन्हा हल्लाबोल

जगातील या महागड्या घटस्फोटांवरही टाका नजर

जागतिक स्तरावरही महागडे घटस्फोट झाले आहेत. यामध्ये जेफ बेझोसपासून ते बिल गेट्सपर्यंत जगातील अव्वल श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि मॅकेन्झी स्कॉट यांचा घटस्फोट 38 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 3.2 लाख कोटी रुपयांमध्ये सेटल झाला होता. बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांचा घटस्फोट 73
अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 8 लाख कोटी रुपयांमध्ये झाला होता. जगभरात अब्जावधी डॉलर्सची घटस्फोटाची प्रकरणे समोर आली आहेत, परंतु गेट्स सेटलमेंट आतापर्यंतचा सर्वात महागडा घटस्फोट म्हणून ओळखल्या जातो. तर भारतात हृतिक रोशन आणि सुजैन खान यांचा घटस्फोट सर्वाधिक महागडा असल्याची माहिती आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -