Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश मुकेश अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी, एका संशयिताला अटक

मुकेश अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी, एका संशयिताला अटक

Subscribe

भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संपूर्ण अंबानी कुटुंबाला 3 तासात संपवण्याची ही धमकी आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पीटलमध्ये हा धमकीचा फोन आल्याची माहिती आहे. अज्ञात व्यक्तीने फाऊंडेशनच्या टेलिफोनवर आज सकाळपासून जवळपास 8 वेळा वेळा हे धमकीचे फोन आल्याची माहिती आहे.  याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने डीबी मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर मुंबई क्राइम ब्राँचने बोरिवलीच्या एमएचबी कॉलनीतून एका संशयित आरोपीला अटक केली असून त्याचे नाव विष्णू विधू भौमीक असे आहे. तो ५६ वर्षांचा आहे. त्याच्या बोलण्यावरून तो मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान रिलायन्स फाऊंडेशनने मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या धमकीच्या कॉलसंदर्भात तात्काळ माहिती दिला. DB मार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पीटलमध्ये धाव घेतली आहे, पोलिसांकडून धमकीचे फोन आलेल्या नंबरची तपासणी सुरु आहे, तसेच हॉस्पीटलमधील प्रत्येकाचे स्टेटमेंट नोंदवले जात आहेत. याशिवाय पोलिसांची एक टीम अंबानींच्या अँटिलिया या निवासस्थानी देखील दाखल झाली आहे. त्याठिकाणची सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

- Advertisement -

मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रिलायन्स फाऊंडेशनच्या हरकिशन दास हॉस्पिटलने रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकीच्या कॉल्सबद्दल तक्रार दाखल केली आहे. हॉस्पिटलमध्ये तीनहून अधिक कॉल्स आले. गुन्हा दाखल करत तपास सुरू आहे.

आज देशभरात 75 वा स्वातंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मुंबईतील अँटिलिया हे निवासस्थान तिरंगी रंगाच्या आकर्षक विद्युत रोषनाईने उजळून निघाले आहे. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या आकर्षक विद्युत रोषनाईसोबत सेल्फी घेण्यासाठी कालपासून मोठ्य़ा संख्येने नागरिक अँटिलियाबाहेर गर्दी करत होते. यावेळी अँटिलियाबाहेर या नागरिकांसाठी कोल्ड ड्रिंक आणि चॉकलेटची व्यवस्था करण्यात आली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

दरम्यान आज मुकेश अंबानींनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नातवाला कुशीत घेऊन हातात तिरंगा फडकवतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात ‘माँ तुझे सलाम’ हे गाणं वाजत आहे. या व्हिडीओमध्ये मुकेश अंबानी त्यांचा नातू पृथ्वी अंबानी आणि पत्नी नीता अंबानी यासह रिलायन्स फाऊंडेशनचे कर्मचारी देखील दिसत आहेत. सर्वांच्या हातात एक तिरंगा आहे.

२०२१ मध्येही मुकेश अंबानींना आल्या होत्या जीवे मारण्याच्या धमक्या 

याआधी 2021 मध्ये मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाबाहेर 20 जिलेटिन स्टिकने भरलेली कार सापडली होती. मुकेश आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांना उद्देशून, जीवे मारण्याची धमकी देणारे धमकीचे पत्र वाहनाच्या आत सोडण्यात आले होते. कारमध्ये जिलेटीन स्टिक असल्याची माहिती मिळाल्यानंतर सचिन वाझे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटसह अनेक पोलीस अधिकारी तपासासाठी घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणाचा तपास सचिन वाझे करीत होते. या घटनेनंतर काही दिवसांनी मनसुख हिरेन या ठाण्यातील व्यावसायिकाचा गूढ मृत्यू झाला होता आणि हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले होते. अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचा मालक हिरेन होता. आठवडाभरापूर्वीच त्यांनी वाहन चोरीला गेल्याचा दावा केला होता. मात्र 5  मार्च 2021 रोजी त्याचा मृतदेह ठाण्यातील नाल्यात सापडला होता.


 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -