राणीबागेतील ‘ओरिओ’ पेंग्विनचा पहिला वाढदिवस दणक्यात, पाहा व्हिडीओ

मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील (राणी बाग) पेंग्विनला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी नेहमीच पाहायला मिळते. काही वर्षांपूर्वी राणीच्या बागेत पेंग्विनच्या दोन पिल्लांचां जन्म झाला.

मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील (राणी बाग) पेंग्विनला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी नेहमीच पाहायला मिळते. काही वर्षांपूर्वी राणीच्या बागेत पेंग्विनच्या दोन पिल्लांचां जन्म झाला. यातील ओरिओ नाव असलेल्या पेंग्विनचा पहिला वाढदिवस झाला. त्याच्या वाढदिवसानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती. या सजावटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

मुंबई महापालिकेने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राणीच्या बागेतील कर्मचारी मोठ्या थाटामाटात ओरिओ पेंग्विनचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला मुंबई महापालिकेने ‘ओरिओ वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असं म्हटलं आहे. त्यानंतर पेंग्विन कक्षातील वाढदिवसानिमित्त केलेली सजावट दाखवण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by The Mumbai Zoo (@themumbaizoo)

ओरिओच्या वाढदिवसानिमित्त एक खास केक बनवण्यात आल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा केक पेंग्विनच्या कक्षात ठेवण्यात आला होता. हा केक पाहून ओरिओदेखील फार खूश असल्याचे दिसत आहे.

भायखळा येथील राणीच्या बागेत डोनाल्ड आणि डेझी ही हम्बोल्ट पेंग्विनची जोडी आहे. या जोडीने १ मे २०२१ रोजी एका पिलाला जन्म दिला होता. त्यांनी त्याचे नाव ओरियो असे ठेवण्यात आले आहे. त्यानंतरच तर मॉल्ट आणि क्लिपर या पेंग्विनच्या जोडीनं जन्म दिलेल्या पिलाचं नाव ऑस्कर ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे आता पेंग्विन कक्षात एकूण ९ पेंग्विन झाले आहेत.


हेही वाचा – मी ब्राम्हणाला नगराध्यक्ष नाही तर मुख्यमंत्री झालेला पाहू इच्छितो, दानवेंचं वक्तव्य अन् शिवसेनेचा पलटवार