मालिका : ‘जुर्म का चेहरा’ करणार थरारक गुन्ह्यांची उकल

cafe marathi launch its first crime fiction show ‘Jurm Ka Chehra’
मालिका : 'जुर्म का चेहरा' करणार थरारक गुन्ह्यांची उकल

टेलिव्हिजन विश्वात एक नवाकोरा हिंदी क्राईम शो प्रेक्षकांकांच्या भेटीस येतोय.’जुर्म का चेहरा’ असे या नवीन हिंदी क्राईम शोचे नाव आहे. ४ सप्टेंबरपासून प्रत्येक शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता ‘द क्यू टीव्ही’ चॅनेल वर ही मालिका प्रसारित होणार आहे. या शो चे होस्ट हिंदीतील नावजलेले अभिनेता किंशुक वैद्य असणार आहेत. या मालिकेचे शूटिंग नाशिक आणि मुंबईमध्ये झाले आहे.

भारतात वेगवेगळ्या राज्यात घडणार्‍या गुन्ह्यांची उकल पोलीस कसे करतात हे या मालिकेत बघायला मिळणार आहे. या मालिकेचे वेगळेपण हे आहे की, गुन्हे जसे गतिशील झाले आहेत आणि त्यांचे स्वरुप कालांतराने बदलत चालले आहे, अशा गुन्हेगारी घटनांचा समावेश यात करण्यात आला आहे. सायबर क्राइम, डेटिंग अॅप फसवणूक, ओळख चोरी, घरफोडी, हिंसा, आमली पदार्थ इत्यादी आधुनिक युगाचे काही गुन्हे आणि त्या गुन्ह्यांची उकल यात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

या शो बद्दल सांगताना निर्माते निखिल रायबोले आणि भूपेंद्रकुमार नंदन सांगतात की, “‘जुर्म का चेहरा’ हा क्राईम शो आपल्या आजूबाजूला असणारे लोक आणि त्यांचे भिन्न भिन्न प्रकारचे चेहरे यांवर भाष्य करणारा आणि त्या गुन्हेगारी चेहऱ्यांपासून सावध करणारा शो आहे. हा शो तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या गुन्हेगारी चेहऱ्यांपासून सावध करेल.” या मालिकेचे दिग्दर्शन विनय सांडिल्य, श्रीप्रसाद पवार आणि प्रविण परब हे करत आहेत.


खुशखबर, ५ नोव्हेंबरपासून राज्यातील नाट्यगृह सुरू होणार