Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी ICU बेड मिळवण्यासाठी थेट HC मुख्य न्यायाधीशांनीच केला BMC Covid-19 हेल्पलाईनवर फोन

ICU बेड मिळवण्यासाठी थेट HC मुख्य न्यायाधीशांनीच केला BMC Covid-19 हेल्पलाईनवर फोन

Related Story

- Advertisement -

मुंबईत सध्या कोरोनाचे चित्र दिलासादायक दिसू लागले आहे. दिवसेंदिवस नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. यादरम्यान उच्च न्यायालयाने मुंबईतील बीएमसीचे कोविड-१० हेल्पलाईन नंबर कार्यरत आहेत की नाही? हे पाहण्यासाठी एक वेगळीच तपासणी केली. थेट उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी बीएमसी कोविड-१९ हेल्पलाईनवर फोन करून आयसीयू बेड्सची विचारणा केली आणि त्यावेळी कोविड-१९ हेल्पलाईनवरून काय प्रतिसाद मिळाला ते पुढे वाचा.

या घडलेल्या घटनेची माहिती पीटीआय वृत्तसंस्थेच्या पत्रकार सुनंदा यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून दिली. आता नेमकं काय घडलं ते पाहुयात.

- Advertisement -

मुंबई हायकोर्टाने बीएमसी कोविड-१९ हेल्पलाईन कार्यरत आहे का? हे तपासण्याचा प्रयत्न केला. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता यांनी वकीलाला १९१६ वर फोन लावण्यास सांगितलं. हेल्पलाईन नंबरवर असलेल्या महिलेला वकीलाने आयसीयू बेड पाहिजे असं सांगितलं. त्यानंतर ऑपरेटरने विचारलं की, कोणता एरिया? वकील (L) म्हणाले, वरळी. मग ऑपरेटर (O)  तिथल्या क्षेत्रातील वॉर रूम क्रमांक देतो. मग वकीलाने वॉर रुम क्रमांकावर फोन केला.

त्यानंतर ऑपरेटरने मोबाईल नंबर मागितला आणि पुन्हा दुसरा नंबर देऊन वकीलाला त्या क्रमांकावर रुग्णाचा कोविड-१९ रिपोर्ट पाठवण्यास सांगितलं. मग बीएमसीचे समुपदेशक अनिल साखरे म्हणाले की, बीएमसी डॉक्टर तुमचे रिपोर्ट तपासतील आणि रुग्णालयात दाखल करणं आवश्यक आहे का ते पाहतील. असा सर्व प्रकार फक्त बीएमसीच्या हेल्पलाईन कार्यरत आहे ते की नाही? हे पाहण्यासाठी घडला.

- Advertisement -

काल (सोमवार) दिवसभरात मुंबईत ३ हजार ८७६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ९ हजार १५० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील आता कोरोनाबाधितांची ६ लाख ३१ हजार ५२७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १२ हजार ८५३ जणांचा मृत्यू झाला असून ५ लाख ४६ हजार ८६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ७० हजार ३७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – Maharashtra Lockdown 2021: राज्यातील लॉकडाऊन वाढणार, विजय वडेट्टीवार यांचे संकेत


- Advertisement -