घरमुंबईCancer Hospital : वांद्रे येथे उभे राहणार 165 खाटांचे कॅन्सर रुग्णालय; शेलारांच्या...

Cancer Hospital : वांद्रे येथे उभे राहणार 165 खाटांचे कॅन्सर रुग्णालय; शेलारांच्या प्रयत्नांना यश

Subscribe

कॅन्सर हा आजार ज्या व्यक्तीला होतो, ती व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय हादरून जातात. त्यातही कॅन्सर हा पहिल्या अथवा दुसऱ्या टप्प्यातील असेल तर उपचार करून बरा होण्याची संभावना अधिक असते. मात्र तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात कॅन्सर रुग्ण उपचार करूनही बरा होणे कठीण बाब असते. मुंबईत टाटा कॅन्सर रुग्णालयात दररोज देशभरातून शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतात

मुंबई : कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर उपचार करणे सामान्य गरीब नागरिकांना परवडत नाही. तसेच, परळ येथील टाटा रुग्णालयात कॅन्सर रोगावर उपचारासाठी जवळची तारीख मिळण्यातही अडचण होते. खासगी रुग्णालयात तर कॅन्सर आजारावर महागड्या दरात उपचार गरीब, सामान्य व्यक्ती करूच शकत नाही. त्यामुळे ही गंभीर बाब लक्षात घेता भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले आहे. मुंबई महापालिका लवकरच वांद्रे (पश्चिम) येथे 165 खाटांचे स्वतंत्र कॅन्सर रुग्णालय उभारणार आहे. त्यामुळे हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. (Cancer Hospital A 165-bed cancer hospital will be built at Bandra Success to Shelars efforts)

कॅन्सर हा आजार ज्या व्यक्तीला होतो, ती व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय हादरून जातात. त्यातही कॅन्सर हा पहिल्या अथवा दुसऱ्या टप्प्यातील असेल तर उपचार करून बरा होण्याची संभावना अधिक असते. मात्र तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात कॅन्सर रुग्ण उपचार करूनही बरा होणे कठीण बाब असते. मुंबईत टाटा कॅन्सर रुग्णालयात दररोज देशभरातून शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र कॅन्सर रुग्ण संख्या अधिक असल्याने अनेक रुग्णांना उपचार घेण्यासाठी टाटा रुग्णालयात जवळची तारीख मिळत नाही. ती रुग्ण व्यक्ती व त्याचे कुटुंबीय जर मोठ्या आशेने मुंबईत बाहेरून आले असतील तर त्यांना महागड्या दरात गेस्ट हाऊस , हॉटेल्स आदी ठिकाणी राहणे परवडत नाही.

- Advertisement -

तसेच, रुग्णाला रुग्णालयात दाखल केलेले नसल्यास नाईलाजाने सदर रुग्ण व त्याचे नातेवाईक हे एखाद्या पदपथावर उघड्यावर झोपतात आणि कसेतरी दिवस काढतात., त्यांना दररोज सकाळचा नाश्ता व बाहेरचे जेवण विकत घेवून खाणे परवडत नाही. रस्त्यावर अंघोळ करण्याची सोय नसते. सर्वच अडचणीचे ठरते. अशा वाईट अवस्थेत त्यांना आपल्या रुग्णांसाठी कसेतरी दिवस काढावे लागतात.

हेही वाचा : Mhada Lottery : पारदर्शक सोडतीमुळे म्हाडावर सर्वसामान्यांचा विश्वास- मुख्यमंत्री शिंदे

- Advertisement -

ही गंभीर बाब लक्षात घेता भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी, मुंबई महापालिकेकडे सतत पाठपुरावा करून वांद्रे (पश्चिम) येथे 165 खाटांचे स्वतंत्र कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा संकल्प सोडला होता. त्यानुसार आता लवकरच नव्याने कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येणार आहे. हे रुग्णालय उभारल्यानंतर कॅन्सर रुग्णांची संध्या वाढत असून सध्या मुंबईत कॅन्सर सेवेचा मुख्य भार असलेल्या परळ येथील आणि नवी मुंबई खारघर येथील टाटा मेमोरियल सेंटर्सवरील कॅन्सर रुग्णांचा भार कमी होण्यास मोलाची मदत होणार आहे. तसेच, मुंबई सेंट्रल जवळील नायर रुग्णालय हे रेडिएशन थेरपी देणारे एकमेव नागरी केंद्र असून त्यावरील भारही काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

वांद्रे येथील भाभा रुग्णालयासमोर असणाऱ्या महापालिकेच्या भूखंडावर स्वतत्र कॅन्सर हॉस्पिटल असावे, अशी संकल्पना स्थानिक आमदार व मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड आशिष शेलार यांनी मुंबई महालिकेकडे मांडली होती. पालिकेने ही मागणी मान्य केली असून याबाबत दोन बैठकाही आयुक्त इक्बाल चहल यांच्यासोबत झाल्या. त्यानुसार वांद्रे कर्करोग रुग्णालयाचा प्राथमिक आराखडा पालिकेने तयार केला आहे.

हेही वाचा : Deepak Kesarkar : जरांगेंनी समाजाच्या सहानुभूतीचा विचार करावा; दीपक केसरकरांचा सल्ला

असे असेल कॅन्सर रुग्णालय

वांद्रे येथे उभारण्यात येणाऱ्या कॅन्सरवरील उपचार देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या अद्यावत रुग्णालयात, केमोथेरपीपासून ब्रॅकीथेरपी आणि रेडिएशनपर्यंत, अतिदक्षता विभागासह संपूर्ण कर्करोग ग्रस्त रुग्णांची काळजी घेण्यात येणार आहे. पालिकेच्या वास्तुविशारद शाखेने तयार केलेला प्राथमिक आराखडा पालिकेच्या इमारत देखभाल विभागाच्या आरोग्य पायाभूत सुविधा कक्षाकडे सादर करण्यात आला आहे.

भाभा हॉ‍स्पिटल समोरिल जमीन 2,525 चौरस-मीटरचा भूखंड सध्या नगरपालिका सुविधांसाठी राखीव आहे. त्यावर हे तळमजला अधिक नऊ-मजली इमारतीचे रूग्णालय प्रस्तावित करण्यात आले आहे. ज्यामध्ये सुमारे 12,000 चौरस मीटरच्या बिल्ट-अप क्षेत्रासह दोन तळघर असतील. रेडिएशन थेरपीसाठी दोन बंकर खोल्या असलेल्या या इमारतीत 12 ओपीडी वॉर्ड, बायोकेमिस्ट्री, हिस्टोपॅथॉलॉजी, हेमॅटोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी यासह पाच प्रयोगशाळा असतील. डायग्नोस्टिक मध्ये, मॅमोग्राफी आणि पीईटी-सीटी युनिट्स देखील असतील. रुग्णालयाच्या इमारतीत लेक्चर हॉल, सेमिनार हॉल, रक्तपेढी आणि आयसोलेशन देखील असेल या सोबत आम्ही रूग्णांच्या नातेवाईकांसाठी वसतिगृहासारखी सुविधा निर्माण करण्याचा विचार करत आहोत कारण टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांना किती त्रास होतो हे मी पाहिले आहे., असे अमदार ॲड आशिष शेलार यांनी  सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -