घरमुंबईब्लड कॅन्सरशी लढत तो करतोय दहावीच्या परीक्षेची तयारी

ब्लड कॅन्सरशी लढत तो करतोय दहावीच्या परीक्षेची तयारी

Subscribe

आयसीयूमध्ये त्याचा सुरू आहे अभ्यास

सध्या आपण अशा अनेक घटना पाहतो की अभ्यासाच्या प्रेशरमुळे काही विद्यार्थी आत्महत्त्या करतात, परीक्षेच्या टेन्शनमुळे आत्महत्त्या करतात. अशा परिस्थितीत नवीन नाईक या मुलाने एक वेगळा आणि सकारात्मक आदर्श निर्माण केला आहे. नवीनला वयाच्या तेराव्या वर्षापासून ब्लड कॅन्सरने ग्रासले आहे. मार्च महिन्यात त्याची दहावीची परीक्षा सुरू असताना त्याला अधिक त्रास सुरू झाला, त्यामुळे त्याला परीक्षा अर्ध्यातून सोडावी लागली. परंतु हार न मानता त्याने पुन्हा जूलै महिन्यातील फेरपरीक्षेसाठी अर्ज केला. नवीन आयसीयू मध्ये असल्याने तिथेच तो जूलै महिन्यात होणाऱ्या परीक्षेची तयारी करत आहे.

वयाच्या तेराव्या वर्षी नवीनला कॅन्सर असल्याचे निदान झाले. केमोथेरपीच्या सहाय्याने त्याचा कॅन्सर बरा झाला. त्यानंतर तो सामान्य आयुष्य जगू लागला. त्याने डॉक्टर व्हायचे ठरवले. परंतु त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे आव्हान येणे अजून बाकी होते. दहावीत गेल्यावर कर्करोगाने पुन्हा डोके वर काढले. दहावीची परीक्षा सुरू असताना अधिक त्रास होऊ लागला. दोन पेपर उरलेले असताना त्याला पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेव्हापासून नवीन अद्याप हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आणि आता तो या आजाराशी पुन्हा दोन हात करत आहे.

- Advertisement -

नवीनवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, ‘त्याच्या रक्तातील प्लेटलेट्स कमी झाले आहेत. तसेच रक्ताचे प्रमाणही कमी झाले आहे, त्यामुळे या सर्व गोष्टी सामान्य होईपर्यंत त्याला तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवावे लागणार आहे. सध्या आम्ही त्याला जी औषधे देत आहोत त्यामुळे कोणत्याही पेशंटला झोप येते. परंतु नवीनने त्यावर मात केली आहे. अशा परिस्थितही तो अभ्यास करतो. सध्या नवीनला उपचारांसाठी आर्थिक मदतीची आलश्यकता आहे’.

लोक करत आहेत मदत
नवीनच्या आई राधा नाईक म्हणाल्या की, ‘मी नवीनच्या उपचारांसाठी आतापर्यंत माझे सर्व दागिणे विकले आहेत. पैसे कमी पडल्याने एका संकेतस्थळाच्या सहाय्याने फंड उभा करून आतापर्यंत ११ लाख रूपये उभे केले आहेत. अजूनही पैशांची आवश्यकता आहे’.

- Advertisement -
Navin-Naiks letter to PM
नवीन याने पंतप्रधांन नरेंद्र मोदी यांना लिहिलेले पत्र

पंतप्रधांनानाही पत्र
आर्थिक मदतीसाठी नवीन याने पंतप्रधांन नरेंद्र मोदी यांच्याकडेदेखील आर्थिक मदतीची मागणी केली आहे. नवीनने पत्रात म्हटले आहे की, मला अजून खूप आयुष्य जगण्याची इच्छा आहे. मला डॉक्टर होऊन लोकांची सेवा करायची आहे. बोन मॅरो तज्ज्ञ व्हायचे आहे. मला आर्थिक मदत करा.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -