बॉलिवूडमधील कार डिझायनर दिलीप छाब्रियाला अटक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कार डिझायनर आणि डीसी डिझाइनचे संस्थापक दिलीप छाब्रियाला अटक करण्यात आली आहे.

Sports car designer Dilip Chhabria police custody till 2 January
बॉलिवूडमधील कार डिझायनर दिलीप छाब्रियाला

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कार डिझायनर आणि डीसी डिझाइनचे संस्थापक दिलीप छाब्रियाला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीस क्राईम बँचनी फसवणूकीच्या प्रकरणात धडक कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आहे. त्यासोबतच त्याची महागडी लक्झरी स्पोर्टस कारही मुंबई पोलिसांनी जप्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप छाब्रिया यांच्याविरोधात १९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याखाली त्याला अटक करण्यात आली आहे.

कोण आहेत दिलीप छाब्रिया?

दिलीप छाब्रिया हे एक मोठे कार डिझायनर आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि मोठ्या उद्योजकांच्या कार आणि व्हॅनिटी व्हॅन डिझायनर केल्या आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्या कार डिजाईन केल्या आहेत. तसेच चित्रपट टार्जन द वन्डर कारचे देखील त्यांनीच डिजाईन केले होते.


हेही वाचा – नव्या वर्षात प्रवासासाठी लागणार वॅक्सिन पासपोर्ट